गोपाल मोटघरे, साम टीव्ही
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलीस स्टेशन हद्दीतील महाळुंगे येथील नामांकित शाळेमध्ये काल दुपारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एकाच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीवर चाकूने हल्ला केला आहे.
इंस्टाग्रामवर अपलोड केलेला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी भाग पाडल्याने अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर चाकू हल्ला केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 17 आणि 18 ऑक्टोंबरला महाळुंगे येथील एका शाळेची सहल ही पंचगणी आणि महाबळेश्वर या ठिकाणी गेली होती. त्या दरम्यान तिथे विद्यार्थिनी डान्स करत असताना आरोपी विद्यार्थ्याने त्याचा व्हिडिओ तयार करून आपल्या इंस्टाग्रामवर टाकला होता.
त्यानंतर या व्हिडिओवरून विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याने आरोपी विद्यार्थ्याला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला होता. याचाच राग मनात धरून आरोपी विद्यार्थ्याने आपल्या शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर धारदार चाकूने हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. या घटनेत विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच या प्रकरणात बावधन पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 109 नुसार गुन्हा दाखल करून आरोपी मुलाची रवानगी बालसुधार कारागृहात केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.