आता मी त्याला शोधायला चाललोय... 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Shrikant Shinde's First Reaction To Manoj Jarange 500 Crore Audio Bomb: मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बवर श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मी ते शोधायला चाललोय असं म्हणत त्यांनी चिमटा काढला.
SHRIKANT SHINDE REACTS TO MANOJ JARANGE'S ₹500 CRORE AUDIO BOMB
SHRIKANT SHINDE REACTS TO MANOJ JARANGE'S ₹500 CRORE AUDIO BOMBsaam tv
Published On: 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टाकलेल्या ऑडिओ बॉम्बमुळे राज्याच्या राजकरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या क्लिपमुळे शिंदेसेना आणि भाजपमध्ये देखील मोठी दरी निर्माण होताना दिसतेय. तसेच या क्लिपमध्ये 500 कोटी श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत जरांगेंना दिलेत असा दावा एका महिलेने केला होता. या प्रकरणारवरून श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले, मागच्या दोन दिवसांपासून यावर माझे संशोधन सुरू आहे. 500 कोटींबाबत मी पण शोध घेत आहे असे ते म्हणाले.

श्रीकांत शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, गेल्या 2 दिवसांपासून मी यावरच रिसर्च करतोय. ज्याच्या कुणाकडे 500 कोटी रुपये पाठवले होते ते माझ्याकडे पोहोचले नाहीत. जो प्रश्न जरांगेंना पडला आहे तो मलाही पडला आहे. मी ते शोधायला चाललोय. आम्ही तीच चर्चा करत होतो. 500 कोटी एकत्र कसे दिसतील, किती गाड्या लागतील. कोण काय बोलते त्याला काही अर्थ नाही. या प्रकरणाची शहानिशा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. काय गोष्टी आहेत त्या कळतील असे शिंदे म्हणाले.

SHRIKANT SHINDE REACTS TO MANOJ JARANGE'S ₹500 CRORE AUDIO BOMB
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

जसे माध्यमे शोधताहेत तसे मी देखील मागील 2 दिवसांपासून शोधण्याचे काम करतोय तुम्ही पण शोधा. संशोधन करा. तुम्हाला कळले तर मला सांगा आणि मला काही कळले तर मी सांगतो असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com