महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Bhanudas Kotkar Passes Away At 74 Ahilyanagar Congress Leader: अहिल्यानगरचे ज्येष्ठ काँग्रेस नेते भानुदास कोतकर यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. माजी महापौर संदीप कोतकर यांचे वडील असलेल्या भानुदास कोतकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Bhanudas Kotkar passed away at the age of 74
Bhanudas Kotkar passed away at the age of 74saam tv
Published On: 

सुशील थोरात, साम टीव्ही

अहिल्यानगरचे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भानुदास कोतकर हे उद्योजक आणि अहिल्यानगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांचे वडील होते. सरपंचपदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास जिल्हा सदस्य, पंचायत समितीचे उपसभापति, नगर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मुंबई मार्केट कामितीचे संचालक आणि नगर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशा विविध पदांपर्यंत पोहोचला होता. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी त्यांनी अहिल्यानगरच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली.

Bhanudas Kotkar passed away at the age of 74
Maharashtra Politics: ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मध्यंतरी दोन हेलिकॉप्टर खरेदी केल्यामुळेही भानुदास कोतकर चर्चेत आले होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अहिल्यानगरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. भानुदास कोतकर यांच्या निधनाने अहिल्यानगरमधील राजकीय क्षेत्रातील एका ज्येष्ठ नेतृत्वाची कारकीर्द संपुष्टात आली आहे.

Bhanudas Kotkar passed away at the age of 74
Election: मोठी बातमी! राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर, मतदान अन् निकाल कधी?

अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर संदीप कोतकर यांचे ते वडील, तर महापौर सुवर्णा कोतकर यांचे ते सासरे होते. माजी आमदार दिवंगत शिवाजीराव कर्डीले आणि माजी आमदार दिवंगत अरुणकाका जगताप यांच्याशीही ते व्याही होते. भानुदास कोतकर यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि कृषि क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com