पुण्यात कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ; किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

pune crime news : पुण्यात कोयता गँगने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली.
pune news
pune crime Saam tv
Published On
Summary

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ

कोंढवा भागात तरुणावर कोयत्याने वार

कोयता गँगच्या हल्ल्यात तरुण जखमी

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यात कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. पुण्यातील कोंढवा भागात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने कोयता गँगने पुन्हा डोके वर काढल्याचे समोर आले आहे.

pune news
पत्नीची निर्घृण हत्या केली, मृतदेहाचे ५ तुकडे पाण्याच्या टाकीत फेकले; पतीच्या भयानक कृत्यानं खळबळ

पुण्यातील कोंढवा भागातील दिलाश शेख या तरुणावर काहींनी कोयत्याने वार केला. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोंढव्यातील दिलशाद शेख या तरुणाने दोघांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. तबरेज शेख (२६) आणि अरबाज खान (३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील कोंढवा खुर्द भागातील शिवनेरी नगर भागात १७ मे रोजी रात्री ११.१५ वाजता ही घटना घडली. तक्रारदार बंद दुकानाजवळ उभा होता. त्याचवेळी आरोपी तिकडे आले. त्यांनी तक्रारदाराच्या दुचाकीमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी हे तक्रारदाराशी वाद घालू लागले. पुढे आरोपींनी तक्रारदाराला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली. या मारहाणीदरम्यान आरोपींनी तक्रारदाराला जमीनीवर पाडलं.

मारहाण करताना आरोपी तरबेजने त्याच्या हातातील कोयत्यासारख्या धारदार शस्त्राच्या पात्याच्या मागील बाजूने तक्रारदाराच्या पाठीवर वार केला. दोघांच्या हल्ल्यात तक्रारदाराला जखमी केले. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या प्रकरणाचा शोध घेतल्यानंतर पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे.

pune news
पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा ट्रेनवर हल्ला, २६ जवानांचा मृत्यू, ७० गंभीर, भयावह व्हिडिओ समोर

सीसीटीव्हीमध्ये काय दिसत आहे?

आरोपींनी तक्रारदाराची कॉलर पकडली. त्यानंतर त्याला बंद दुकानावर आपटलं. आरोपींच्या मारहाणीमुळे तक्रारदार जमिनीवर कोसळला. त्यानंतर आरोपीसोबत असलेल्या तरुणांनीही तक्रारदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीदरम्यान एकाने हळूच खिशातून कोयत्यासारखा दिसणारं शस्त्र बाहेर काढलं. त्यानंतर आरोपीने तक्रारदाराच्या पाठीवर वार केले. या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com