पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा ट्रेनवर हल्ला, २६ जवानांचा मृत्यू, ७० गंभीर, भयावह व्हिडिओ समोर

Baloch Liberation Army News : बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टामध्ये पाकिस्तानी सैनिकांना घेऊन जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर भीषण बॉम्बहल्ला झाला. या हल्ल्यात २६ जवानांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
BLA attack on Pakistani military train in Quetta
BLA attack on Pakistani military train in Quetta
Published On

BLA attack on Pakistani military train in Quetta : बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टामध्ये पाकिस्तानी सैनिकांना घेऊन जाणाऱ्या ट्रेन बलुच लिबरेशन आर्मीने बॉम्बने उडवल्याची धक्कादायक घटना घडली. या भयंकर हल्ल्यात २६ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला, तर ७० हून अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची स्थिती पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या आत्मघाती हल्ल्याची अधिकृत जबाबदारी स्वीकारली आहे.

क्वेट्टा येथील चमन गेटजवळ आज सकाळी बलुच आर्मीने जाफर एक्सप्रेसवर हल्ला केला. पाकिस्तानी जवानांना घेऊन जाणारी ट्रेन क्वेट्टा छावणीतून जात होती, त्यावेळी बलुच आर्मीने हा स्फोट घडवून आणला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात २६ जण जागीच ठार झाले, तर ७० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याशिवाय ट्रेनला लागलेली आग विझवण्याचेही काम युद्धपातळीवर आहे.

BLA attack on Pakistani military train in Quetta
पुणेकरांसाठी Good News! पाषाण आणि सूसची वाहतूककोंडी फुटणार, कनेक्टिव्हिटीचा नेमका काय प्लान?

स्फोटामुळे रेल्वेचे डबे रुळावरून घसरले

या स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती की ट्रेनचा एक डबा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. इंजिनसह तीन डबे रुळावरून घसरले आणि दोन उलटले आहेत. स्फोटाचा परिणाम केवळ ट्रेनपुरता मर्यादित नव्हता. जवळच पार्क केलेल्या इतर दहा वाहनांचेही मोठे नुकसान झाले. जवळच्या इमारतींच्या काचा आणि खिडक्या फुटल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

BLA attack on Pakistani military train in Quetta
पोलीस दलात खळबळ! ड्युटीवर जाणाऱ्या ASI ची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या; नेमका वाद काय?

घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, बचाव पथके आणि आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलिसांकडून शोध व बचाव कार्य सुरू करण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, पण अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

BLA attack on Pakistani military train in Quetta
Crime : डॉक्टरकीला काळीमा! ऑपरेशन थिअटरमध्येच बारावीच्या मुलीवर बलात्कार, मेडिकल क्षेत्रात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com