Khadakwasla Dam News: दुर्देवी! पोहण्यासाठी गेलेला तरुण खडकवासला कालव्यात बुडाला; परिसरात खळबळ

Pune Latest News: खडकवासला धरणात बुडून मृत्यू झाल्याची ही एकाच महिन्यातील तिसरी समोर आली आहे.
 Khadakwasla Dam News
Khadakwasla Dam NewsSaamtv
Published On: 

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Khadakwasla Dam News: पुण्यातील खडकवासला धरण परिसरातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. खडकवासला कालव्यात पोहण्यासाठी आलेला एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. राहुल भगवान येवले असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून तो मूळ अहमदनगरचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या या बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू आहे. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खडकवासला धरणात बुडून मृत्यू झाल्याची ही एकाच महिन्यातील तिसरी समोर आली आहे.

 Khadakwasla Dam News
Jalgaon Cyber Crime: क्रेडीट कार्डचे लिमीट वाढवायचे सांगत फसवणुक

याबाबत अधिक माहिती अशी की, मुळचा अहमदनगरचा (Ahmednagar) असलेला राहुल येवले व त्याच्या खोलीत राहणारे इतर पाच मित्र आज रविवारी कालव्यात पोहण्यासाठी खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) मागच्या बाजूला आले होते. यावेळी राहुल व आणखी एका मित्राला पोहता येत नसल्यामुळे ते कडेला थांबले होते. यावेळी उर्वरित इतर चार जण पोहत होते.

मात्र अचानक राहुल पाण्यात उतरला आणि त्याचा तोल गेला व तो पाण्यात बुडू लागला. दूर अंतरावर पोहत असलेले इतर सहकारी ओरडत आले परंतु तोपर्यंत राहुल दिसेनासा झाला होता. याबाबत त्याच्या मित्रांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून तरुणाचा शोध सुरू आहे. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

 Khadakwasla Dam News
Beed News: यापुढे ऊस तोडणीला जाऊ नका... बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचे मजूरांना आवाहन; कारण काय?

चेहेडी बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू...

दरम्यान, आज (११, जून) नाशिक जिल्ह्यातूनही अशीच एक दुर्देवी घटना उघडकीस आली आहे.  नाशिकरोड परिसरातील दारणा नदीवरील महापालिकेच्या (Nashik) चेहेडी बंधाऱ्यात सिन्नरफाटा (Sinnar) भागातील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडाले. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. (Breaking Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.