Beed News: यापुढे ऊस तोडणीला जाऊ नका... बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचे मजूरांना आवाहन; कारण काय?

तुम्ही इथेच रहा, रोजगार हमी योजनेतून आम्ही तुम्हाला रोजगार देऊ.. असे आवाहन दीपा मुधोळ यांनी केले आहे.
Beed Latest News
Beed Latest NewsSaamtv
Published On

Collector Deepa Mudhol News: बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्याला लागलेली ऊसतोड कामगाराची ओळख पुसण्याचा निर्धार बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपा मुधोळ या ऊसतोड कामगारांच्या महिलांसाठी आयोजित विविध मेळाव्याला हजेरी लावत मार्गदर्शन करत आहेत. काय आहे दीपा मुधोळ यांची ही संकल्पना, जाणून घ्या सविस्तर....

Beed Latest News
Maharashtra Politics: वारीतील प्रत्येक दिंडीला ५० हजार रुपये द्यावेत; काँग्रेसची शिंदे सरकारकडे मोठी मागणी

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ (Deepa Mudhol) या त्यांच्या वेगळ्या कार्यशैलीमुळे ओळखल्या जातात. बेधडक अधिकारी अशी त्यांची खास ओळख आहे. सध्या त्यांनी बीड जिल्ह्याची अनेक वर्षांपासून असलेली ऊस तोड मजूरांचा जिल्हा ही ओळख मिटवण्याचा चंग बांधला आहे. ज्यासाठी त्या गेल्या काही दिवसांपासून ऊसतोड कामगार महिलांसाठी आयोजित विविध मेळाव्याला हजेरी लावत मार्गदर्शन करत आहेत.

या मेळाव्यांमधून "तुम्ही अगदी तुमच्या आजोबांच्या काळापासून ऊस तोडणीला जात आहेत. ऊस तोडणीला तुम्ही एकदम पैसे मिळतात म्हणून जातात. मात्र या पैशामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे का ? तुम्ही चांगले घर बांधलेत का ? शेतजमीन घेतली आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न विचारत तुम्ही इथंच रहा, प्रशासन तुम्हाला आवश्यक त्या सुविधा देईल, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Beed Latest News
Rajendra Singh News: पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्या भयानक आजाराने ग्रस्त! पाणीवाल्या बाबांचे सरकारला कडू डोस

आज बीडच्या (Beed News) वडवणी शहरात ऊसतोड कामगारांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बोलताना दीपा मुधोळ (Collector Of Beed) यांनी ऊसतोड कामगार महिलांना ऊस तोडणीला जाऊ नका, तुम्ही इथेच रहा, रोजगार हमी योजनेतून आम्ही तुम्हाला रोजगार देऊ. असे आवाहन केले आहे.

आपल्याला बीड जिल्हा हा व्यवसायिकांचा आणि विकसनशील शेतकऱ्यांचा करायचा आहे. त्यामुळे तुम्ही ऊसतोडणीला जाऊ नका.. असे म्हणत "तुम्ही माझ्याकडे ऊस तोडणीला जायचंय आरोग्याची सुविधा मिळत नाही, असे प्रश्न घेऊन येऊ नका. तर आम्हाला ऊस तोडणीला नाही जायचं, आम्हाला इथं सुविधा उपलब्ध करून द्या, असे प्रश्न घेऊन या मी ते सगळे प्रश्न सोडवेन" असे आश्वासन त्या या मेळाव्यांमधून देत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com