Rajendra Singh News: पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्या भयानक आजाराने ग्रस्त! पाणीवाल्या बाबांचे सरकारला कडू डोस

Rivers Of Western Maharashtra: राज्यातल्या नद्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून अमृत महोत्सवी निमित्ताने "चला जाणूया नदीला" हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
Rajendra Singh
Rajendra Singhsaam tv
Published On

Western Maharashtra Rivers condition: पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्यांची भयानक आजाराने ग्रस्त होऊन आयसीयूमध्ये भरती झाल्याप्रमाणे अवस्था आहे. तसेच नद्यांचे स्वास्थ ठीक करण्यासाठी उपचार चुकीच्या पद्धतीने सुरू आहेत, अशी टीका पाणीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पूर व दुष्काळ मुक्त महाराष्ट्र कार्यशाळेत बोलत होते.

राज्यातल्या नद्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून अमृत महोत्सवी निमित्ताने "चला जाणूया नदीला" हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत जलबिरादारी व वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीमध्ये पूर व दुष्काळ मुक्त महाराष्ट्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस पार पडणाऱ्या या कार्यशाळेमध्ये देशभरात पाणीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा यांनीही सहभाग घेतला.

Rajendra Singh
Devendra Fadnavis News: राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष निवडीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'शरद पवार यांनी भाकरी...'

यावेळी बोलताना राजेंद्र सिंह यांनी नद्यांचे प्रदूषण आणि राज्य सरकारच्या वाळू व नदी वळवण्याच्या धोरणावर जोरदार टीका केली. पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच नद्या आज भयानक आजाराने ग्रस्त आहेत, आयसीयूमध्ये भरती झाल्याप्रमाणे त्यांची स्थिती आहे, असे ते म्हणाले. तसेच गेल्या 30 वर्षांपासून हळूहळू या नद्या आजारी पडल्या आहेत. त्यामुळे त्या लगेच बऱ्या देखील होणार नाहीत. राज्य सरकारकडून या नद्यांचे समस्या जाणून घेऊन, त्यादृष्टीने उपाययोजना होत नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

उदाहरण देताना राजेंद्र सिंह म्हणाले, कृष्णा नदीचा विचार केला तर या नदीची समस्या वेगळी आहे. मात्र तिच्यावर वेगळ्या पद्धतीचे उपचार केले जात आहेत. त्यामुळे नदी ठीक होणार नाही, अशी असे म्हणत नद्या आजारमुक्त करायच्या असतील तर नद्यांच्या समस्या आधी जाणून घेतल्या पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. (Latest Political News)

Rajendra Singh
Cheapest 5G Smartphone: फक्त 599 रुपयांमध्ये खरेदी करा 'हा' 5G स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे ऑफर

ते पुढे बोलताना म्हणाले, पूरस्थितीवर उपाय म्हणून सरकारकडून नद्या वळवण्याचे धोरण घेण्यात येत आहे, मात्र ते अत्यंत चुकीचे आहे. नद्यांच्या वळण हे खरंतर संवर्धन करण्याची गरज आहे. नद्यांचा सरळीकरण झाल्यास पाणी थेट निघून जाईल. त्यामुळे पाणी जमिनीत मुरणार नाही. यामुळे नदी जशी वाहते, तशीच तिला वाहू दिलं पाहिजे...नद्यांचे जे स्वातंत्र्य आहे. ते आबाधीत ठेवलं पाहिजे. नाहीतर नद्या तर मरतीलच आणि आपण देखील मरू अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारच्या वाळू धोरणावरही राजेंद्र सिंह यांनी टीका केली. ते म्हणाले, वाळू उत्खनन करताना लिहिलं एक जातं आणि केलं एक जातं. त्यामुळे वाळू उत्खननाबाबतीत राज्य सरकारने सामाजिक संस्थांना विश्वासात घेऊन धोरण ठरवलं पाहिजे. कारण वाळू ही नदीची फुफुसं आहेत. त्यांचं संरक्षण होणं गरजेचं आहे असं मत देखील राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com