Pune Karvenagar CCTV video of Theft
Pune Karvenagar CCTV video of TheftSaam Tv News

Pune Crime : ती आली, तिनं पाहिलं अन् मोबाईल घेऊन गायब, पुण्यात चोरीची भयंकर घटना; CCTVमध्ये सारं काही कैद

Pune Karvenagar CCTV video of Theft : ही घटना १५ जून रोजी सकाळी ६.३० वाजता घडली. फिर्यादी हे त्यांच्या व्यावसायासाठी गेले असता त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली. ही घटना पुण्यातील कर्वेनगर परिसरात असलेल्या दुधाने हाईट्स येथे घडली.
Published on

अक्षय बडवे, साम टिव्ही

पुणे : पुण्यातील कर्वेनगर भागात एक धक्कादायक घटन उघडकीस आली आहे. या भागात एका महिला चोरांनी घरात शिरुन चक्क ४ मोबाईल गायब केले आहेत. या महिला चोराने आपल्या साथीदारासह मोबाईल आणि काही रोकड लंपास केली आहे. या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुरलीधर आंगरे यांनी याबाबत पोलीस स्थानकत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १५ जून रोजी सकाळी ६.३० वाजता घडली. फिर्यादी हे त्यांच्या व्यावसायासाठी गेले असता त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली. ही घटना पुण्यातील कर्वेनगर परिसरात असलेल्या दुधाने हाईट्स येथे घडली. फिर्यादी यांचा त्यांच्या घराखालीच डेअरी आणि हॉटेलचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांच्याकडे काही पाहुणे आले होते. पहाटेच्या वेळी त्यांनी त्यांचे दार न लावता आत झोपले होते याचाच फायदा या चोरट्यांनी घेतला.

Pune Karvenagar CCTV video of Theft
Pune : शरद पवारांच्या एका वाक्यानं टळला राजकारणातील संभाव्य भूकंप; चर्चेला फुलस्टॉप!

फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नीकडे काम असल्यामुळे त्यांनी तिला फोन लावला असता तो बंद लागला. त्यांनी घरी शोध घेतला असता मोबाईल मिळून आला नाही तसेच त्यांच्या पाहुण्यांचा फोन सुद्धा मिळून आला नाही. आपल्या घरी चोरी झाल्याचं लक्षात येता त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. या घटनेबाबत मुरलीधर आंगरे यांनी वारजे पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

Pune Karvenagar CCTV video of Theft
Pune: पुण्यात समलिंगी कपलनं केला विवाह; राम अन् श्याम यांनी बांधली लग्नगाठ; PHOTO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com