Pune : शरद पवारांच्या एका वाक्यानं टळला राजकारणातील संभाव्य भूकंप; चर्चेला फुलस्टॉप!

Sharad Pawar clears stance on NCP merger with Ajit Pawar faction : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याच्या चर्चेला शरद पवार यांच्या एका वक्तव्यानंतर पूर्णविराम मिळालाय. "संधीसाधुपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही," असं स्पष्टपणे सांगत शरद पवारांनी भाजपसोबत गेलेल्या गटावर टीका केली आहे.
No alliance with BJP supporters: Sharad Pawar on NCP reunion
Sharad Pawar addressing a program in Pimpri-Chinchwad, rules out NCP merger with Ajit Pawar group.saam tv
Published On

sharad pawar Ajit Pawar Latest News : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. संधीसाधुपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही, असे म्हणत शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर मोठं वक्तव्य केलेय. ते पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. सत्तेसाठी भाजपसोबत जाणाऱ्यांची साथ नकोच, त्यांना पुन्हा पक्षात स्थान नाहीच, असेही यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता दोन्ही राष्ट्रावादी काँग्रस एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे.

राज्यात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पक्षाचा मेळावा पार पडला. त्यामध्ये बोलताना शरद पवार यांनी पक्षाची पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले अथवा पक्षाची साथ सोडणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवारांच्या या ठाम भूमिकेमुळे आगामी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात मोठा कलाटणीबिंदू निर्माण झाला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण राहील आणि कोण नव्या गटात सामील होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No alliance with BJP supporters: Sharad Pawar on NCP reunion
Pune : पुण्यातील "या" पोलिस ठाण्यात पोलिसांनाच बसायला जागा नाही, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

संधीसाधुपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही, असं थेट विधान शरद पवार यांनी केलं आहे. सत्तेसाठी जायचं ही भूमिका असेल तर हा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार नाही. कुणाशीही संबंध ठेवा, भाजपशी नको. संधीसाधुपणाचं राजकारण आपल्याला लोकशाहीत करायचं नाही. यामुळं आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळू शकतो. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा संकल्प मेळावा घेतला. आगामी महापालिका निवडणुकीआधी त्यांनी हा मेळावा घेतला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. जे पक्षात संधीसाधुपणा करतात,अशांना मी सोबत घेणार नाही. नेहरू, गांधी आणि शाहू, फुले-आंबेडकरांचं विचार असणाऱ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

No alliance with BJP supporters: Sharad Pawar on NCP reunion
Wedding Turns Tragic : लग्नाच्या आदल्या रात्रीच होणाऱ्या नवऱ्याला संपवलं, नवरी प्रियकरासोबत झाली फरार

पिंपरी चिंचवड येथे शरद पवार यांनी १९८० च्या निवडणुकीचा एक संस्मरणीय किस्सा सांगितला. १९७८ मध्ये ते मुख्यमंत्री होते. १९८० च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे ७० आमदार निवडून आले, परंतु त्यापैकी फक्त ६ जण वगळता बाकी सर्वांनी त्यांना सोडले. या घटनेने त्यांना प्रश्न पडला की, लोकांनी जनाधार दिला, तरीही त्यांचे सहकारी त्यांना का सोडून गेले? यानंतर त्यांनी पक्षाकडे पुन्हा लक्ष दिले आणि जे आमदार त्यांना सोडून गेले, त्यापैकी ९१ टक्के जणांचा निवडणुकीत पराभव झाला. यातून त्यांनी एक धडा शिकला की, कोण येते, कोण जाते याचा फारसा विचार करू नये. ते म्हणाले, या देशाची लोकशाही नेत्यांमुळे नव्हे, तर जनतेमुळे टिकून आहे, असे शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com