Pune: पुण्यात समलिंगी कपलनं केला विवाह; राम अन् श्याम यांनी बांधली लग्नगाठ; PHOTO व्हायरल

Shyam and Ram Wedding: पुण्यात श्याम आणि राम यांनी पारंपरिक विधींनुसार विवाह करून LGBTQ+ समुदायासाठी प्रेम आणि समानतेचं प्रेरणादायी उदाहरण सादर केलं. समारंभात ढोल-ताशांचीही विशेष रंगत.
Pune News
LGBTQ+ WEDDING IN PUNE CELEBRATES LOVE BEYOND GENDER AND RELIGIONSaam TV News
Published On

पुण्यात आगळ्या वेगळ्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मिस्ट एलजीबीटीक्यू फाउंडेशनचे सह- संस्थापक श्याम आणि राम हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. हा विवाहसोहळा हिंदू आणि ख्रिश्चन पारंपरिक विधींनुसार पार पडले. तीन दिवस चाललेल्या या विवाह समारंभात हळदी, मेहंदी, संगीत असे सर्व पारंपारिक सोहळे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. सध्या सोशल मीडियावर या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pune Wedding
Pune WeddingSaam

प्रेमाला कुठलंही बंधन नसतं, ना त्याला कसलीही सीमा असते. जात, धर्म, लिंग यांच्या पलिकडे जाऊन प्रेम निभावलं जातं. याचंच एक उत्तम उदाहरण पुण्यातून समोर येत आहे. राम आणि श्याम या समलिंगी कपलचा नुकताच विवाह सोहळा पार पडला. हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने त्यांनी लग्नगाठ बांधली.

तीन दिवस चाललेल्या या विवाहसोहळ्यात हळदी, मेहंदी असे विविध पारंपारिक सोहळे अगदी उत्साहात पार पडले. पहिले दाक्षिणात्य हिंदू परंपरेनुसार विवाहसोहळा पार पडला. नंतर ख्रिश्चन विधीनुसार त्यांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देणार असल्याचं वचन दिलं.

या सोहळ्यात खरी रंगत शिकंडी ढोल ताशा पथकामुळे आली. या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याबाबत मनस्वी म्हणाल्या, 'हा विवाहसोहळा म्हणजे समाजातील बदलती मानसिकता आहे. आपण उचललेलं सामाजिक प्रगतीचं पाऊल आहे. LGBTQ+ समुदायासाठी हा विवाहसोहळा एक प्रेरणादायी उदाहरण आहे. यातून आपल्याला प्रेम खुलेपणाने करण्याची आणि आयुष्य जगण्याची ताकद देते'.

Pune News
Shocking Crime: '२ हजार द्या डेडबॉडी गुंडाळतो'; मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा लाचखोर सीसीटीव्हीत कैद

२० वर्षांपूर्वी पुण्यातच पहिला समलैंगिक कपलचं विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर आज राम आणि श्याम या जोडप्यानं विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पुण्यात लग्नगाठ बांधली.

हा विवाहसोहळा समाजाला प्रेम, अभिमान याबद्दलचा नवा संदेश देतो. प्रेमावर कोणतेही बंधन नसते आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचे प्रेम सन्मानाने जपण्याचा पूर्ण हक्क आहे, हे या विवाहाने दाखवून दिलं आहे.

Pune News
Politics: मोठा राजकीय भूकंप! काँग्रेसमधील बडा नेता अजित पवार गटाच्या गळाला लागला; ११ हजार कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com