रोहिदास गडगे , साम प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील अपघात प्रकरणातील आरोपी मयूर मोहितेंना न्यायालयाने दणका दिलाय. मयूर मोहिते दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालायने फेटाळलाय. मयूर मोहिते हे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे आहेत. मयूर मोहिते यांच्या वकिलाकडून खेड उपजिल्हा न्यायालयात जामीन सादर करण्यात आला होता. मात्र न्यायालयाकडून हा अर्ज फेटाळण्यात आलाय. खेड उपजिल्हा न्यायालयात पुन्हा २६ तारखेला याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
दोन दिवसापूर्वी कळंब येथे मयूरने आपल्या कारने एकाला चिरडलं होतं. आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे मयूर मोहिते सुसाट कार चालवत दुचाकीस्वाला चिरडलं होतं. या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता तर एकजण गंभीर जखमी झाला होता. अपघातावेळी कारचालकाने मद्यपान केलं होतं,असं म्हटलं जात आहे. दरम्यान घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त करत आमदार मोहिते यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली होती. अपघातानंतर माझा पुतण्या मयुर साहेबराव मोहिते हा कुठंही पळून गेला नाही. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा त्याने मद्यपान केलेलं नव्हतं, असं मोहिते यांनी स्पष्ट केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.