Pune Crime: बायको अन् मित्राला मेल केला, नंतर IT इंजिनीअरची २५० फूट खोल दरीत उडी

Pune-Based IT Engineer Jump In Lonavala Gorge: पुण्यातील एका आयटी अभियंत्याने लोणावळ्यातील लायन्स पॉइंटच्या दरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नी आणि मित्रांना ईमेल पाठवला होता.
Pune-Based IT Engineer Jump In  Lonavala Gorge
Police investigation underway at Lion’s Point near Lonavala, where a Pune-based IT engineer ended his life after sending a farewell email.saam tv
Published On
Summary
  • पुण्यातील आयटी इंजिनिअरने लोणावळ्यात आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

  • पत्नी आणि मित्रांना निरोपाचा ईमेल पाठवल्यानंतर दरीत उडी मारली.

  • लायन्स पॉइंट येथील २५० फूट खोल दरीत उडी घेत आत्महत्या केली आहे.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुण्यातील एका आयटी इंजिनिअरने आपल्या पत्नी आणि मित्रांना ईमेल पाठवल्यानंतर दरीत उडी मारून आत्महत्या केली. ईमेलमध्ये त्यांच्याविषयी मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. हाती आलेल्या माहितीनुसार ही घटना लोणावळ्यात घडलीय. पुण्यातील आयटी इंजिनिअरने लोणावळा येथील लायन्स पॉइंट येथील २५० फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.

Pune-Based IT Engineer Jump In  Lonavala Gorge
Pune Crime पुणे हादरले! दारू पिण्यावरून टोकाचं भांडण, तरुणाने बापाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

मृत इंजिनिअर हा पुण्यातील बाणेर येथील एका आयटी कंपनीत काम करत होता. त्याचे नाव अभियंता वीरेंद्र सिन्हा (३२ वय) असे आहे. आत्महत्या करण्यापूर्वी वीरेंद्रने आपली पत्नी आणि मित्रांना निरोप घेणारा ईमेल पाठवला होता. त्यात त्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. गुरुवारी सकाळी लायन्स पॉइंटजवळ त्याची गाडी बेवारस अवस्थेत आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Pune-Based IT Engineer Jump In  Lonavala Gorge
Pune : ६ गुन्हे, अनेक गाड्या चोरी, पण शेवट असा! पुणे पोलिसांनी रचला सापळा अन् चोरांच्या मुसक्या आवळल्या

काल सकाळी त्याची कार लायन्स पॉईंट येथे पार्क केलेली आढळली. त्याने येथूनच त्याच्या मित्रांना व पत्नीला मेसेज आणि मेलद्वारे याबाबत पहाटे कळवले. मिळालेल्या माहितीच्या आधारे येथील दरीत शोध सुरु केला असता. ज्या ठिकाणी त्याने गाडी पार्क केली होती, तेथील समोरील दरीत साधारण २५० फूटांवर वीरेंद्र सिन्हा याचा मृतदेह आढळला.

पत्नी आणि मित्रांना मेसेज पाठवला

आत्महत्या करण्यापूर्वी वीरेंद्रने आपल्या पत्नी आणि मित्रांना ईमेल आणि मेसेजद्वारे काही संदेश पाठवला. दरम्यान पोलीस त्याच्या आत्महत्येमागील कारण तपासत आहेत. लोणावळा ग्रामीण पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने संयुक्त शोध मोहीम राबवली. सुमारे २५० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलीस मृताचे ईमेल आणि मेसेज बारकाईने तपासत आहेत. जेणेकरून आत्महत्येमागील कारण समोर येईल.

हाती आलेल्या माहितीनुसार, इंजिनिअर वीरेंद्र आणि त्याच्या पत्नीचं भांडण झालं होतं. पत्नीसोबत भांडण झाल्याने रागात असलेल्या वीरेंद्रने आत्महत्येचा निर्णय घेतला. पत्नीला केलेल्या मेसेजमध्ये वीरेंद्र म्हणाला की, मी कारची चावी कारच्या चाकाखाली ठेवलीय. दरम्यान वीरेंद्रची कार जेव्हा बेवारस आढळली तेव्हा त्याने आत्महत्या केल्याचा खुलासा झाला. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सुरुवातीच्या तपासात त्याच्या पत्नीच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी अद्याप कोणत्याही संशयितांची नावे जाहीर केलेली नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com