भाच्याचा संसार मोडल्याचा प्रचंड राग! जंगलात नेऊन सासऱ्याच्या डोक्यात घातला दगड; पुण्यात हत्येने खळबळ

Pune Hadapsar crime news : पुण्यातील हडपसरच्या महंमदवाडी परिसरात कौटुंबिक वादातून ४३ वर्षीय व्यक्तीची दगडाने डोक्यात वार करून हत्या करण्यात आली. आरोपीने हत्येनंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेत काळेपडळ पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
Police investigating a murder case in Hadapsar, Pune
Pune murder case linked to a family disputeSaam TV (AI)
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Pune Crime News Update : भाच्याचा संसार मोडल्याच्या रागातून एकाने भाच्याच्या सासऱ्याची डोक्यात मोठा दगड मारून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. हडपसर भागातील महंमदवाडी येथील लक्ष्मी पार्कजवळील फॉरेस्टच्या डोंगरावर रविवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर रक्ताने माखलेला आरोपी स्वतः चालत पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

नेमकी घटना काय?

मयत व्यक्तीचे नाव सैफन बाबूलाल सय्यद (वय ४३, रा. हडपसर, पुणे) असे आहे. सैफन यांच्या मुलगी सना हिचा विवाह आरोपी हनुमंत उर्फ सागर कांबळे (वय २५, रा. महंमदवाडी, पुणे) याच्या भाच्याशी झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी आरोपीच्या भाच्याचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर सना आणि सासरच्या मंडळींमध्ये वाद सुरू होते.

रविवारी पुन्हा वाद झाल्यानंतर सना रागाच्या भरात घराबाहेर पडून जंगलाच्या दिशेने निघून गेली. तिला शोधण्यासाठी तिचे वडील सैफन सय्यद आणि आरोपी हनुमंत कांबळे हे दोघे महंमदवाडीतील फॉरेस्टच्या डोंगराकडे गेले.

Police investigating a murder case in Hadapsar, Pune
Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! हायप्रोफाईल सोसायटीचा ११ वा मजला जळून खाक, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

वादाचे रूपांतर हत्येत:

डोंगरावरील सिमेंटच्या टाकीजवळ पोहोचल्यावर, 'सना सासरी व्यवस्थित राहत नाही' या कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. या वादातून संतापलेल्या हनुमंत कांबळे याने तेथे पडलेला एक मोठा दगड थेट सैफन यांच्या डोक्यात मारला. हा वार इतका भीषण होता की सैफन यांचा जागीच मृत्यू झाला.

Police investigating a murder case in Hadapsar, Pune
मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

आरडाओरडा करत आरोपी पोलीस ठाण्यात हजर:

हत्या केल्यानंतर रात्री पावणेबाराच्या सुमारास आरोपी हनुमंत कांबळे हा रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये, रडत आणि आरडाओरडा करत थेट काळेपडळ पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने स्वतःच पोलिसांना घटनेची माहिती देऊन आत्मसमर्पण केले.

या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी आरोपी हनुमंत कांबळे याच्यावर हत्येचा (भारतीय न्याय संहिता कलम १०३(१)) गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. काळेपडळ पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com