Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! हायप्रोफाईल सोसायटीचा ११ वा मजला जळून खाक, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Vile Parle fire : मुंबईतील विलेपार्ले येथील शांता भवन इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग लागली. या दुर्घटनेत अडीच वर्षांच्या मुलासह २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून अन्य नागरिक जखमी झाले.
Fire and smoke from an 11th-floor apartment in Vile Parle, Mumbai
Fire breaks out on the 11th floor of Shanta Bhavan in Vile ParleSaam TV Marathi
Published On

Mumbai Vile Parle fire Death Toll : मुंबईतील विलेपार्ले भागात मंगळवारी रात्री एका निवासी इमारतीच्या ११ व्या मजल्याला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. विलेपार्ले येथील 'शांता भवन' या इमारतीत रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास ही आग लागली. या आगीत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह एका २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य तीन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ११ व्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. (Mumbai Vile Parle Shanta Bhavan fire latest news)

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या पथकाने ११ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अडकलेल्या सहा जणांची सुटका केली. त्यामध्ये तीन पुरुष, दोन महिला आणि एक मूल. सर्वांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तासभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, पण या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. आगीत अडीच वर्षांचे बाळ आणि २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर इतर तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना विले पार्ले पश्चिम येथील चर्च रोडवरील सेंट झेवियर्स शाळेजवळ शांता भवन इमारतीत रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. नानावटी रुग्णालयाच्या सीएमओ डॉ. मुग्धा यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांना रुग्णालयात दाखल करताच मृत घोषित करण्यात आले. मृतांमध्ये अडीच वर्षांचा अबीर आणि २३ वर्षीय अंकिता यांचा समावेश आहे. जखमींमध्ये पार्थ (३२), हिरेन (६४), यशस्वी आणि अभिषेक यांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Fire and smoke from an 11th-floor apartment in Vile Parle, Mumbai
शिंदेंना मुख्य नेता हे पद कुणी दिलं? धनुष्यबाण दिलाच कसा?, ठाकरेंच्या वकिलांचा आयोगावर शाब्दिक बॉम्ब, कोर्टात काय झालं?

मुंबई अग्निशमन दलाने रात्री १०:१६ वाजता आग लेव्हल १ म्हणजेच किरकोळ असल्याचे सांगण्यात आले. पण रात्री १०:१६ वाजताच आगीची तीव्रता लेव्हल २ म्हणजेच मध्यम असल्याचे समजले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीचे कारण अज्ञात आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, परिसरातील वीज पुरवठादार, रुग्णवाहिका सेवा आणि बीएमसी वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कुलिंगचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Fire and smoke from an 11th-floor apartment in Vile Parle, Mumbai
मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

इमारतीतील ४,००० चौरस फूट क्षेत्रातील विजेचे वायरिंग, इलेक्ट्रिक उपकरणे, एसी, घरातील वस्तू, सोफा, बेड, फॉल्स सीलिंग आणि स्वयंपाकाची भांडी आगीमध्ये खाक झाल्या. या दुर्घटनेत एकूण आठ जण बाधित झाले होते; त्यापैकी दोन जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. कूपर रुग्णालयात उपचार घेतलेल्या दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या उर्वरित चार जखमींची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com