

पुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या
हडपसरमध्ये भरचौकात करण्यात आली हत्या
पुणे पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली
आईच्या बॉयफ्रेंडची मुलीच्या प्रियकराने केली हत्या
पुण्यामध्ये भरचौकात एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली होती. या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. आईच्या बॉयफ्रेंडने प्रेमसंबंध तोडण्यासाठी दबाव टाकल्याने आणि धमकी दिल्यामुळे मुलीच्या प्रियकराने त्याची हत्या केली. पुण्यातल्या हडपसरमधील काळेपडळ परिसरात ३ मे रोजी ही घटना घडली होती. या हत्याकांडाप्रकरणी सराईत गुन्हेगारासह ६ जणांना पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश बिरादार (२५ वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. गणेश हडपसर येथील ससाणेनगरमध्ये राहतो होता. तो विवाहित होता. त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो ज्या महिलेवर प्रेम करत होता त्या महिलेच्या मुलीचे सराईत गुन्हेगार दुर्वांग उर्फ पारस मानकर (२१ वर्षे) या तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत. दुर्वांग पुण्यातील टिळक रस्ता येथे राहतो. गणेशने आपल्या गर्लफ्रेंडच्या मुलीला दुर्वांगसोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. प्रमेसंबंध तोडण्यासाठी गणेशकडून सतत दबाव टाकला जात होता आणि धमक्या दिल्या जात होत्या. यामुळे दुर्वांग संतप्त झाला होता.
३ मेच्या रात्री साडेदहाच्या सुमारास दुर्वांगने आपल्या सहकाऱ्यांसह गणेश बिरादारला भरचौकात गाठले. यावेळी दुर्वांगने गणेशला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यानंतर दुर्वांगने गणेशच्या डोक्यात दगड घातला आणि पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी सापळा रचत आरोपींना अटक केली.
या प्रकरणी दुर्वांग ऊर्फ पारस सुनील मानकर (वय २१, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता), पारस किशोर गायकवाड (वय २१, रा. दत्तवाडी, सिंहगड रस्ता), अभिजित उर्फ अभी संजय इंगळे (वय २२), सोमनाथ रमेश दोरकर (वय २१), साहिल सागर शेलार (वय २४, सर्व रा. हडपसर), चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय २०, रा. सुखसागरनगर, कात्रज) या सर्व आरोपींनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.