

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात रस्त्याच्या मधोमध एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे पोलीस आणि प्रशासनाविरुद्ध लोकांमध्ये संतापाची लाट उसळलीये. समोर आलेल्या माहितीनुसार, एका ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. यामुळे अनेक भागात संतप्त निदर्शनं सुरू झाली आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी टायर्सची जाळपोळ करण्यात आली. तर भाजी आणि फळांच्या गाड्यांना आग लावण्यात आली. ज्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालंय. शहरात सुमारे चार तास गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा ती मुलगी तिच्या आजीच्या घरी जात होती. एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने तिला रस्त्यावर एकटी पाहिलं. यावेळी नराधमाने संधी साधून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. पीडितेचा आक्रोश ऐकून जवळचे लोक घटनास्थळी धावून आले पण तोपर्यंत आरोपी पळून गेला होता.
या घटनेची बातमी पसरताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली. सकाळपर्यंत, मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि निषेध करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते अडवले. आंदोलनादरम्यान टायर जाळल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. संतप्त जमावाने काही भाजी आणि फळांच्या गाड्यांनाही आग लावली ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाला शांत करण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. खबरदारीचा उपाय म्हणून संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
पोलिसांनी पीडित व्यक्तीला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात पाठवलं आणि घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. घटनेनंतर आरोपी घरातून फरार झाला असून पोलिसांनी कठोर भूमिका घेत त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतलंय. आरोपी कुठे असू शकतो याचा शोध घेण्यासाठी त्यांची चौकशी सुरू केली आहे.
पोलीस कार्यालयाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर एसडीपीओ वन राजीव कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन करण्यात आलीये. पीडितेच्या आईच्या जबाबाच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.