आधी बायकोच्या बॉयफ्रेंडची हत्या केली, नंतर प्रायव्हेट पार्ट जाळला; विवाहबाह्य संबंधामुळे नवऱ्याचं हादरवणारं कृत्य

Bihar Husband Kills Wifes Lover Burns Private Parts: बिहारच्या मोतिहारीमध्ये विवाहबाह्य संबंधातून एक धक्कादायक हत्या उघडकीस आली आहे. पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या करून त्याच्या खासगी अवयवाला आग लावल्याची खळबळजनक घटना समोर आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Bihar Husband Kills Wifes Lover Burns Private Parts
Bihar Husband Kills Wifes Lover Burns Private Partssaam tv
Published On

बिहार (मोतिहारी): माझा पती अस्लम नेपाळमध्ये राहतो. तो बऱ्याच दिवसांपासून घरी आला नव्हता. त्याच्या एका मित्रासोबत माझे संबंध निर्माण झाले होते. याचा संशय माझ्या पतीला आला होता. गेल्या दोन दिवसांपासून अजय मला घरी येण्यासाठी सांगत होता. तो म्हणत होता लुधियानाहून तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, एकदा भेट तरी. मी ठरवलं होतं की त्याला रात्री बोलवेन, जेणेकरून कुणालाही कळणार नाही. पण माझं नशीब खराब होतं. तो घरी आला आणि त्याच वेळी माझा पतीही आला. त्याने अजयला खूप मारहाण केली, त्याच्या खासगी अवयवाला आग लावली आणि गळा आवळून त्याची हत्या केली.अशी खळबळजनक कबुली तब्बूने पोलिसांना दिली.

Bihar Husband Kills Wifes Lover Burns Private Parts
खरात, अयाननंतर आणखी एक व्हिडिओकांड! ५०० महिला, प्रायव्हेट व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग, तरुणाच्या कृत्यानं सगळेच हादरले

नेमके प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये तब्बूने घरातील विरोधाला न जुमानता तिचा चुलत भाऊ अस्लमसोबत लग्न केले. अस्लम हा पिकअप ड्रायव्हर होता आणि त्याला ड्रायव्हिग त्याचा मित्र अजयने शिकवली होती. अजय आणि अस्लमची घट्ट मैत्री होती. त्यामुळे अस्लमचा अजयवर पूर्ण विश्वास होता. अस्लम कामावर असताना अजय अनेकदा त्याच्या घरी जात चहा नाश्त्यासाठी जायचा. याचदरम्यान त्याची तब्बूशी ओळख झाली. हळूहळू या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले.

Bihar Husband Kills Wifes Lover Burns Private Parts
Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

2023 मध्ये तब्बूला बाळ झाल्यानंतर तिने अजयसोबत बोलणे कमी केले. मात्र अजयकडे त्यांचे काही फोटो होते. जेव्हा तब्बूने त्याच्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा त्याने रागाच्या भरात ते फोटो अस्लमला पाठवले आणि त्यांचे प्रेम संबंध असल्याचे सांगितले. यानंतर पतीने संतापात तब्बूला मारहाण केली आणि तिला त्याच्या आई वडिलांकडे पाठवले. त्यानंतर अस्लम पुन्हा नेपाळला कामासाठी निघून गेला, आणि अजय लुधियाना येथे कामाला गेला.

Bihar Husband Kills Wifes Lover Burns Private Parts
Pune Crime: पुणे हादरले! महापालिका कर्मचाऱ्याची घरासमोर हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयावरून जागीच संपवलं

अजय दोन वर्षांनंतर लुधियानाहून परत आला होता आणि तब्बूला भेटण्यासाठी वारंवार फोन करत होता. ८ मे २०२६ रोजी रात्री ११ च्या सुमारास तब्बूने त्याला घरी बोलावले. अजय खाण्यासाठी काही पदार्थ घेऊन आला होता. आम्ही जेवण सुरू करणार इतक्यात अचानक अस्लम तिथे पोहोचला. त्याने आधी मला मारहाण करून दुसऱ्या खोलीत कोंडले. त्यानंतर अजय आणि अस्लममध्ये जोरदार भांडण झाले. दोन तासांनंतर अस्लमने माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि तो पळून गेला. अंगणात रक्ताचे डाग पडले होते आणि त्याची गळा आवळून हत्या केली होती. तसेच त्याचा प्रायव्हेट पार्ट देखील जाळून टाकला होता. या घटनेमुळे परिसर हादरला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com