Thane : ठाणे हादरलं! महिला डॉक्टरने इमारतीतून उडी मारून संपवलं जीवन; ३ मुलं झाली पोरकी

Thane Sucide News : ठाण्यातील मुंब्रा परिसरात महिला डॉक्टरने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना. कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
THANE MUNICIPAL DOCTOR SUICIDE SHOCKING MUMBRA INCIDENT
THANE MUNICIPAL DOCTOR SUICIDE SHOCKING MUMBRA INCIDENTSaam Tv
Published On
Summary
  • ठाण्यातील मुंब्रा परिसरात महिला डॉक्टरची आत्महत्या

  • इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याची माहिती

  • आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलिस तपास सुरू

  • या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात आणि परिसरात खळबळ

विकास काटे, ठाणे

Thane Sharming Dinga Sucide News ठाणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आपल्या राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शारमिंग डिंगा असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून त्या हकीम अजमल खान रुग्णालयात कार्यरत होत्या. शारमिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा परिसरातील ग्रेस स्कोअर या इमारतीत राहणाऱ्या शारमिंग डिंगा यांनी आपल्या राहत्या इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले. ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

THANE MUNICIPAL DOCTOR SUICIDE SHOCKING MUMBRA INCIDENT
Railway Rules : रेल्वेचा मोठा निर्णय! ट्रेनमधील मिडल बर्थ सकाळच्या सुमारास राहणार बंद, काय आहे या मागचं कारण?

घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. त्यानंतर शारमिंग डिंगा यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

THANE MUNICIPAL DOCTOR SUICIDE SHOCKING MUMBRA INCIDENT
Kitchen Hack : उन्हाळ्यात मडक्यातलं पाणी पिताय? थांबा! त्यापूर्वी 'हे' आधी करा

याबाबत त्यांच्या कुटुंबीयांची आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. दरम्यान, शारमिंग डिंगा या तीन मुलांची आई असून त्यांचे पती परदेशात नोकरीसाठी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू ठेवला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com