Pune Crime News: नोकरीच्या बहाण्याने सौदी अरेबियात नेलं अन्... पुण्यातील महिलांसोबत घडलं भयंकर

Pune Crime News: पुण्यातील तीन महिलांना नोकरीचं अमिष दाखवून सौदी अरेबियात नेण्यात आलं. तिथे त्यांच्यासोबत जे घडलं ते ऐकूण अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली.
pune Crime News women assaulted tortured in saudi arabia state women commission help
pune Crime News women assaulted tortured in saudi arabia state women commission helpSaam TV

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नोकरी तसेच पैसे कमावण्याचं अमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याच्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील तीन महिलांना नोकरीचं अमिष दाखवून सौदी अरेबियात नेण्यात आलं. तिथे त्यांच्यासोबत जे घडलं ते ऐकूण अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

pune Crime News women assaulted tortured in saudi arabia state women commission help
Pune Accident News: नगर-कल्याण महामार्गावर भयानक अपघात; तरुणीसह महिलेचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर

अरेबियात सफाई कामगार म्हणून तुम्हाला नोकरी मिळेल, दरमहा ४० हजार रुपयांचे वेतन देखील मिळेल, असं अमिष दाखवलं. आर्थिक परिस्थितीमुळे खचलेल्या महिलांनी लगेच यासाठी होकार दिला. (Latest Marathi News)

आमिषाला बळी पडून महिलांनी मुंबईतील दलाल महिलांशी संपर्क साधला. या दलाल महिलांनी पुण्यातील (Pune News) तीन महिलांना सौदी अरेबियातील रियाध शहरात साफसफाईचे काम मिळवून दिले. इतकंच नाही, तर दलालांनी या गरीब महिलांची प्रत्येकी ४ लाख रुपयांत विक्री केली.

सौदी अरेबियात व्यक्तींनी या तीनही गरीब महिलांचा छळ (Crime) सुरू केला. या महिलांकडून दिवसभर काम करून घेतले जात होते. तसेच त्यांना वेळवर जेवण सुद्धा देत नव्हते. दरम्यान, एका सामजिक कार्यकर्त्याने ही बाब राज्य महिला आयोगाच्या निर्दशनात आणून दिली.

महिला आयोगाच्या पाठपुराव्यामुळे या महिलांना भारतात परत आणण्यात यश आले. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी मुंबईतील दलालांवर गुन्हा दाखल केला आहे. नसरीन भाभी, अब्दुल हमीद शेख, शमिमा खान आणि हकीम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

pune Crime News women assaulted tortured in saudi arabia state women commission help
Pune Accident News: नगर-कल्याण महामार्गावर भयानक अपघात; तरुणीसह महिलेचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com