Pune Accident News: नगर-कल्याण महामार्गावर भयानक अपघात; तरुणीसह महिलेचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर

Ahmednagar-Kalyan highway Accident: भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पायी जात असलेल्या तरुणीसह दुचाकीला जोरदार धडक दिली.
Pune News horrific accident on Ahmednagar-Kalyan highway girls and women dies one seriously injured
Pune News horrific accident on Ahmednagar-Kalyan highway girls and women dies one seriously injured Saam TV

Accident on Ahmednagar-Kalyan highway

पुणे जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पायी जात असलेल्या तरुणीसह दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये तरुणीसह दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune News horrific accident on Ahmednagar-Kalyan highway girls and women dies one seriously injured
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी फुटणार; MSRDCने घेतला मोठा निर्णय

जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थरकाप उडवणारी ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर परिसरात घडली. या घटनेनं ओतूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९ वर्ष) आणि सविता गीताराम तांबे (वय ४५ वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. तर गीताराम नामदेव तांबे (वय ५२ वर्ष) असं जखमी दुचाकीस्वाराचं नाव आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत ऋतुजा डुंबरे ही रस्त्याने घरी चालत जात होती.

त्याचवेळी गीताराम तांबे आणि त्यांची पत्नी सविता हे दोघे पती-पत्नी दुचाकीवरुन आळेफाट्याच्या दिशेने जात होते. अचानक भरधाव वेगात एक पिकअप आला. काही कळण्याच्या आत या पिकअपने रस्त्याने चाललेल्या तरुणीसह आणि दुचाकीवरील पती-पत्नीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण (Accident News) होती, की यामध्ये दुचाकीवरील महिला आणि पायी चाललेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी पिकअप वाहन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाला. अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. ओतूर पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Edited by - Satish Daud

Pune News horrific accident on Ahmednagar-Kalyan highway girls and women dies one seriously injured
Astrology Today: गौरी आवाहनानंतर या राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल; तुमची यात रास आहे का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com