अक्षय बडवे
Pune News: पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती वेळ देत नाही म्हणून बायको चांगलीच भडकली. त्यानंतर चिडलेल्या बायकोने नवऱ्याच्या आय टी कंपनीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. पुण्यातील चंदननगर भागात ही धक्कादायक घटना घडली. (Latest Marathi News)
नेमकं काय घडलं?
पुण्यातील हे सुशिक्षित जोडपं आहे. पती हा आय टी कंपनीत नोकरीला आहे. पती त्याच्या कामात सतत व्यग्र असायचा. त्यामुळे त्याला पत्नीला वेळ देता येत नव्हता. त्यामुळे त्याच्या पत्नीची फार चिडचिड व्हायची.
पती वेळ देत नसल्याने या चिडलेल्या पत्नीने थेट त्याच्या आय टी कंपनीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. पत्नीने नवऱ्याच्या ईमेल आयडीवरूनच कंपनीला धमकी दिली. विशेष म्हणजे ही महिला सुशिक्षित असून तिचा पती देखील एका नामांकित आय टी कंपनीमध्ये कार्यरत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती एका नामांकित आय टी कंपनीमध्ये कार्यरत असून कामामुळे तो त्याच्या बायकोला वेळ देत नव्हता. त्याचा काटा काढण्यासाठी तिने एक अनोखी शक्कल लढवली. तिने पतीच्या इमेलवरुन थेट एका आय टी कंपनीला बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली.
आयटी कंपनीत बॉम्ब असल्याचा खोटा दावा करणाऱ्या या ईमेलमुळे पोलिसांनी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी ईमेलमध्ये पतीचा फोन नंबर सापडला होता. पोलिसांनी ईमेलचा आयपी ॲड्रेस शोधून काढला. धमकीचा मेला पतीच्या मोबाईलवरून केला असल्याचे तपासात समोर आले. चौकशीदरम्यान आरोपी महिलेने ईमेल पाठवल्याचे मान्य केले.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या महिलेवर ५०६ (२) कलमान्वये आणि आयटी अॅक्टनुसार चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.