Pune : धक्कादायक! जनगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण, पुण्यात १० जणांचे काळं कृत्य

Pune crime news : पुण्यात जनगणनेचे काम करत असलेल्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वारगेट पोलिसांत १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

female census worker assaulted in Pune : पुण्यात जनगणना करायला गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ५ ते १० जणांकडून आधी शिवीगाळ आणि मारहाण केली. पुण्यातील महर्षीनगरमध्येही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे महापालिकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून विकास मोरे क्रांती मोरे मुक्ता कसबे लीलावती मोरे अभिजीत मोरे व इतर अनोळखी पाच महिला व पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही सगळी घटना 27 मे रोजी दुपारी तीन ते साडेचार दरम्यान मीनाताई ठाकरे वसाहत या ठिकाणी घडली.

Crime News
Ladki Bahin Yojana : ४ दिवसांत मे महिना संपणार, 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० कधी जमा होणार? वाचा लेटेस्ट अपडेट

यातील तक्रारदार या पुणे महानगरपालिकेच्या कर्मचारी असून सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामासाठी कार्यरत आहेत. 27 मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या मीनाताई ठाकरे वसाहत या ठिकाणी जनगणनेच काम करत असताना आरोपी विकास मोरे यांची पत्नी क्रांती मोरे बहिण मुक्ता कसबे पुतण्या अभिजीत मोरे या सर्वांनी मिळून त्यांना काम करत असताना अडथळा निर्माण केला आणि त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.

Crime News
MLC Election : महायुतीत पुन्हा रस्सीखेच! भाजप-शिंदेंची शिवसेना आमनेसामने; पाहा कुणाकडे किती मतांची संख्या

आज फिर्यादी पुन्हा एकदा त्या भागात जनगणनेचे काम करण्यास गेले असता त्यांनी काल झालेल्या प्रकरणानंतर संबंधित कुटुंबाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काल झालेल्या भांडणाच्या रागातून मोरे कुटुंबीयांनी फिर्यादी यांच्या पाठीमागून येऊन त्यांना दगडाने मारहाण करून लाथा बुक्क्या देखील मारल्या अशी फिर्याद फिर्यादी यांनी पोलिसात दिली आहे. यावरून पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Crime News
ठाकरेंच्या शिवसेनेसारखा ममतांचा पक्ष फूटणार? ५० आमदार, २० खासदार बाहेर पडणार, भाजप खासदाराच्या दाव्याने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com