Pune : आळंदीत दुहेरी हत्याकांड! ७० वर्षी महिला आणि ६ वर्षांच्या मुलीची हत्या, धक्कादायक कारण समोर

Pune Pimpri Chinchwad : आळंदीत ७० वर्षीय महिला आणि ६ वर्षांच्या मुलीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. प्रेमसंबंधातील वादातून घडलेल्या या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केली आहे.
Pune : आळंदीत दुहेरी हत्याकांड! ७० वर्षी महिला आणि ६ वर्षांच्या मुलीची हत्या, धक्कादायक कारण समोर
Pune Pimpri Chinchwad Aalandi Double MurderSaam tv
Published On
Summary
  • आळंदीत दुहेरी हत्याकांड

  • महिला आणि चिमुकलीचा मृत्यू

  • प्रेमसंबंधातील वादातून आरोपीचा संताप

  • धारदार शस्त्राने दोघांची हत्या

  • पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केली

गोपाळ मोटघरे,पुणे

Pune Pimpri Chinchwad Aalandi Double Murder देवाची आळंदी ही काल सकाळी दुहेरी हत्याकांडाने हादरली होती. आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान वाडी या ठिकाणी एका तरुणाने, ७० वर्षीय महिला आणि एका सहा वर्षाच्या मुलीची धारदार शस्त्राने हत्या केली. याप्रकरणी आता पोलिसांनी २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे मृत महिला प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने तरुणाने हे पाऊल उचलले असल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव विनायक तुकाराम भवारी (वय ३१) असे आहे. तर मृत महिलेचे नाव मंगल चंद्रकांत शिंदे असे आहे. तसेच मृत चिमुकलीचे नाव धनश्री सोनू केदारी असे आहे. विनायक भवारी याचे ४७ वर्षीय महिला संगीता केदारीशी प्रेमसंबंध होते. संगीता केदारी ही धनश्रीची नात्याने आजी होती.

Pune : आळंदीत दुहेरी हत्याकांड! ७० वर्षी महिला आणि ६ वर्षांच्या मुलीची हत्या, धक्कादायक कारण समोर
Nagpur : नागपूर हादरलं! दिवसाढवळ्या पोलिसाची निर्घृण हत्या, तिघांनी धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

मात्र विनायकचे इतरही काही महिलांशी विवाहबाह्य प्रेम संबंध असल्याने संगीताने त्याला आपल्या घरात राहण्यास मज्जाव केला होता. संगीता कामावर जाताना धनश्रीला शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे यांच्या घरी सांभाळण्यासाठी ठेवून जायची. दरम्यान विनायकला संगीताहीने घरात राहण्यास नकार दिल्याने तो संतापला होता. शेजारी राहणाऱ्या मंगल यांच्या सांगण्यावरून संगीताने असं केलं असावं अशी शंका त्याला होती.

Pune : आळंदीत दुहेरी हत्याकांड! ७० वर्षी महिला आणि ६ वर्षांच्या मुलीची हत्या, धक्कादायक कारण समोर
Konkan Railway : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! आता दिवा स्थानकातून सुटणार पॅसेंजर; वाचा सविस्तर

या शंकेतून विनायकने मंगल यांच्या घरी जाऊन धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली. तसेच शेजारी असलेल्या ६ वर्षीय धनश्रीची देखील निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक तीन पोलीस पथकाने पुणे नाशिक रोडवरील आळेफाटा या ठिकाणी जाऊन विनायकला बेड्या ठोकल्या आहेत.याप्रकरणी पुढील तपास सुरु असून या घटनेने आळंदी हादरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com