Nagpur : नागपूर हादरलं! दिवसाढवळ्या पोलिसाची निर्घृण हत्या, तिघांनी धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

Nagpur Police Officer Murder News : नागपूरमध्ये पोलीस अधिकरी पंकज ठाकूर यांची लोखंडी सळ्यांनी हल्ला करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Nagpur : नागपूर हादरलं!  दिवसाढवळ्या पोलिसाची निर्घृण हत्या,  तिघांनी धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं
Nagpur Police Officer Murder NewsSaam tv
Published On
Summary
  • नागपूरमध्ये SRPF जवानाची हत्या

  • लोखंडी सळ्यांनी हल्ला करून जीव घेतला

  • दोन आरोपी अटकेत, एकाचा शोध सुरू

पराग ढोबळे,नागपूर

Nagpur Police Officer Pankaj Thakur Murder News नागपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. शहराच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वानाडोंगरी येथील मातोश्री नगरमध्ये एका राज्य राखीव दलाच्या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी पंकज ठाकूर यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मेहुणा यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पंकज ठाकूर हे आपल्या कुटुंबासह मातोश्री नगरमध्ये राहत होते आणि एसआरपीएफ (राज्य राखीव पोलीस दल) मध्ये कार्यरत होते. आरोपी तरुण आकाश मंडल हा गेल्या एक वर्षापासून त्यांच्या अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. आकाश सतत ठाकूर यांच्या घराच्या परिसरात वावरत असे. यावरून पंकज ठाकूर यांनी यापूर्वीही त्याला ताकीद दिली होती.

Nagpur : नागपूर हादरलं!  दिवसाढवळ्या पोलिसाची निर्घृण हत्या,  तिघांनी धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं
Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, आधी पोटच्या मुलीचा गळा दाबला, नंतर ६ वर्षांच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी मारली

मात्र आकाशने गुरुवारी दुपारी पुन्हा ठाकूर यांच्या घराजवळ गेला. यावेळेस पंकज ठाकूर यांनी त्याला फटकारले. एवढंच काय एक कानशिलात लगावली. याच रागातून आरोपी आकाश मंडलने त्याचा भाऊ हर्षित मंडल आणि आई पुष्पा मंडल यांच्यासह रात्री साडेदहाच्या सुमारास पंकज ठाकूर यांना घराबाहेर बोलावले आणि लोखंडी सळ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

Nagpur : नागपूर हादरलं!  दिवसाढवळ्या पोलिसाची निर्घृण हत्या,  तिघांनी धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं
KDMC : केडीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिक निलंबित

यादरम्यान मध्यस्थी करायला गेलेला ठाकूर यांच्या मेहुण्यावर देखील हल्ला झाला. या हल्ल्यात दोघे जखमी झाले. दोन्ही जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान पंकज ठाकूर यांचा मृत्यू झाला.

Nagpur : नागपूर हादरलं!  दिवसाढवळ्या पोलिसाची निर्घृण हत्या,  तिघांनी धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं
Kalyan : कल्याणमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, डॉक्टरचा जागीच मृत्यू

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते, परंतु पोलिसांनी तत्परता दाखवत दोन आरोपींना अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे, आरोपी पुष्पा मंडल ही देखील पोलीस विभागातच लिपिक पदावर कार्यरत आहे. एमआईडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com