संतापजनक! पुणे रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री ४ वर्षीय मुलीवर अत्याचार

pune shocking : पुणे रेल्वे स्टेशनवर संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
pune shocking news
pune shocking Saam tv
Published On
Summary

पुणे रेल्वे स्टेशनवर ४ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना

अत्याचाराची घटना १७ फेब्रुवारी रोजी घडली

लोहमार्ग पोलिसांकडून एका आरोपीला अटक

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : पुण्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर ४ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ५ दिवसानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनवर ४ वर्षे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घटना घडली. रेल्वे स्टेशनवर 17 फेब्रुवारी रोजी ४ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली. नराधमांनी रेल्वे स्टेशनवर फ्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि दोन वरून घेऊन गेले. त्यानंतर तिथेच मध्यरात्री मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

pune shocking news
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने २० लाखांची खंडणी; व्यावसायिकांमध्ये खळबळ, कारवाईत टोळीचं पुणे कनेक्शन उघड

नेमकं काय घडलं?

अल्पवयीन मुलीची आई,वडील आणि मुलगी प्लॅटफॉर्मवर झोपली होती. त्यावेळी दोघांनी फसवून मुलीला घेऊन स्टेशनच्या आवारात अत्याचार केला. मुलीला चॉकलेट,बिस्कीट खाण्याच्या आमिष दाखवून आरोपीकडून लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आरोपींवर आहे. मुलगी आणि आरोपी दोघेही परप्रांतीय असून लोहमार्ग पोलिसांनी एका आरोपीला पकडलेलं आहे.

pune shocking news
राज्याच्या प्रशासनात मोठा उलटफेर; दोन बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

लोहमार्ग पोलिसांनी या संदर्भात अधिक तपास करत आहेत. आरोपीला कोर्टात हजर करून अटक केली आहे. याबाबत अजून काही आरोपीचा तपास पोलीस करत आहेत. मुलीवर अत्याचार झाल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवासी आणि नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Q

अत्याचाराची धक्कादायक घटना कुठे घडली?

A

पुणे रेल्वे स्टेशनवर ही अत्याचाराची घटना घडली आहे.

Q

अत्याचार प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली ?

A

लोहमार्ग पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com