राज्याच्या प्रशासनात मोठा उलटफेर; दोन बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

ias transfers : राज्याच्या प्रशासनात मोठा उलटफेर झाला आहे. राज्यातील दोन बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. जाणून घ्या कोणाची कुठे बदली झाली.
ias transfer news
ias transfer Saam tv
Published On
Summary

दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात

राजेश नार्वेकर यांची परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती झालीये

ॉसमीर कुर्तकोटी यांची शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई येथे सचिवपदी नियुक्ती झालीये

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. निवडणुकीनंतर तीन आएएस अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं होतं. त्यातील दोन अधिकारी निवृत्त झाले आहेत. आता राज्य सरकारने दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

राज्य शासनाने आज शुक्रवारी आएएस अधिकाऱ्याचे बदलीचे आदेश जारी केले आहेत. राजेश नार्वेकर (IAS:SCS:2009) यांची परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर समीर कुर्टकोटी (IAS:SCS:2013) यांची मुंबईतील फी रेग्युलेटरी प्राधिकरणाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदर बदली आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. या नियुक्त्यांमुळे संबंधित विभागांच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ias transfer news
शेळी पालन ते ऊस उत्पादन, महाराष्ट्रातील ५५ प्रगतीशील शेतकऱ्यांची युरोप टूर; काय काय अभ्यास करणार?

कोण आहेत राजेश नार्वेकर?

राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यांची मार्च २०२४ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदावरून सहकार आयुक्तावर बदली करण्यात आली होती. पुढे सप्टेंबर २०२४ मध्ये एफडीएमध्ये येण्याआधी मुंबईमध्ये माहिती तंत्रज्ञान संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची महाराष्ट्र एफडीए आयुक्त म्हणून नियुक्त झाली होती. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागात आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांची आज परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.

ias transfer news
गोकूळ महासंघाकडून दूध दरात वाढ; ग्राहकांना मोठा फटका, आता किती रुपयांनी दूध महागणार?

कोण आहेत समीर कुर्तकोटी?

समीर कुर्तकोटी यांची फेब्रुवारी २०२५ मध्ये बदली ही राज्य कर (State Tax) सहआयुक्त पदावरून TRTI पुण्यात करण्यात आली होती. ते आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते.आता मुंबईतील शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्यांनी बुलढाणा आणि भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य कर विभागात काम पाहिलं आहे. बुलढाणा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी ग्रामीण विकास आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com