Dhangar Reservation:
Dhangar Reservation:Saamtv

Baramati News: बारामती शहरात कडकडीत बंद; धनगर बांधवांच्या उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Dhangar Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांकडून बारामती बंदची हाक देण्यात आली आहे.
Published on

Dhangar Reservation Protest Baramati:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच पेटले आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. बारामतीमध्ये चंद्रकांत वाघमोडे या तरुणाचे आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाकडून बारामती बंदची हाक देण्यात आली आहे.

धनगर समाजाच्या (Dhanagar Reservation) आरक्षणाच्या मागणीसाठी बारामतीत (Baramati) गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. चंद्रकांत वाघमोडे या युवकानं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. शासनाकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होत आहे.

त्यामुळेच या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर बांधवांकडून बारामती बंदची हाक देण्यात आली. या बंदला बारामतीत उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शहरातील बाजरपेठांमध्ये शुकशुकाट दिसत असून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

Dhangar Reservation:
Kartiki Ekadashi: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आजपासून विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू राहणार; मंदिर समितीचा निर्णय

सुप्रिया सुळेंनी घेतली होती भेट..

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या उपोषणस्थळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली होती. यावेळी उपोषणकर्त्यांकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. यावर सुप्रिया सुळे यांनी राजीनामा देऊन प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. (Latest Marathi News)

Dhangar Reservation:
Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार; गावदेवी पोलिसांत गुन्हा, नराधमाला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com