Kartiki Ekadashi: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आजपासून विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू राहणार; मंदिर समितीचा निर्णय

Pandharpur Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सायंकाळपासून विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे.
Pandharpur vitthal mandir will open 24-hours due to kartiki ekadashi
Pandharpur vitthal mandir will open 24-hours due to kartiki ekadashi Saam TV
Published On

Pandharpur Kartiki Ekadashi Latest News

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सायंकाळपासून विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून रांगेत उभं राहण्याचा कालावधी कमी होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur vitthal mandir will open 24-hours due to kartiki ekadashi
Buldhana Accident: बुलढाण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; ऐन भाऊबीजेच्या दिवशीच 3 तरुणांचा मृत्यू

दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपूरमध्ये दाखल होत असतात. विठुरायाचे दर्शन मिळावे, यासाठी तासनतास वारकऱ्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. हीच बाब लक्षात घेता मंदिर समितीकडून विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू ठेवण्यात येते.

त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होते अशी प्रथा आहे. आज सायंकाळी देवाचा पलंग बाहेर काढला जाणार आहे. यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, कार्तिकी एकादशी ही २३ नोव्हेंबर रोजी होणार असून यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काही दिवसांपूर्वी तयारीचा आढावा घेतला. विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या निवासाचा ६५ एकर भक्ती सागर याची पाहणी केली. यावेळी त्यांनी दर्शन रांगेत कोणत्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

Pandharpur vitthal mandir will open 24-hours due to kartiki ekadashi
Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार; गावदेवी पोलिसांत गुन्हा, नराधमाला अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com