Buldhana Accident: बुलढाण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; ऐन भाऊबीजेच्या दिवशीच 3 तरुणांचा मृत्यू

Buldhana Accident News: भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.
Buldhana Accident News
Buldhana Accident NewsSaam TV
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Accident News

राज्यात दिवाळीचा उत्सव आनंदात साजरा केला जात असताना बुलढाणा जिल्ह्यात एक भयानक घटना घडली. भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील वडनेर गावाजवळ घडली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana Accident News
Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार; गावदेवी पोलिसांत गुन्हा, नराधमाला अटक

स्वप्निल करणकार (वय २७ वर्ष, राहणार जळगाव खान्देश) गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्ष, राहणार वराड तालुका भुसावळ), आकाश राजू आखाडे राहणार कल्याण अशी मृत तरुणांची नावे आहेत. ऐन भाऊबीजीच्या दिवशी ३ तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक ६ वर दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. दरम्यान, वडनेर गावाजवळ (Buldhana News) ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती (Accident News) मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Buldhana Accident News
Mohammed Shami Bowling: न्यूझीलंडच्या फलंदाजांना कसं फसवलं? मॅचविनर शमीने सांगितला वानखेडेवरचा गेम प्लान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com