भाजपच्या 100 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; पक्षात खळबळ

Pune BJP Corporators Show Cause Notice Latest News: पुण्यात भाजपच्या 126 पैकी 100 हून अधिक नगरसेवक प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाला गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. गैरहजेरीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता आहे.
Ravindra Chavan's Pune Event Sees Major BJP Corporator Absence, Written Explanation Likely
Ravindra Chavan's Pune Event Sees Major BJP Corporator Absence, Written Explanation Likelysaam tv
Published On: 

पुण्यात भाजपच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीचा मुद्दा चर्चेत आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला भाजपचे 126 पैकी 100 हून अधिक नगरसेवक गैरहजर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Ravindra Chavan's Pune Event Sees Major BJP Corporator Absence, Written Explanation Likely
ट्रॅफिकची झंझट कायमची मिटणार! मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट फक्त ५ मिनिटांत; मुंबईकरांसाठी मोठी बातमी

या गैरहजेरीची दखल घेत आता संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावून कार्यक्रमाला का नाही आले याचा लेखी खुलासा मागवला जाण्याची शक्यता आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नगरसेवकांची नोंद केल्याची माहितीही समोर आली आहे. विशेष म्हणजे, काही नगरसेवक कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीची निघून गेल्याची चर्चा आहे.

Ravindra Chavan's Pune Event Sees Major BJP Corporator Absence, Written Explanation Likely
गरब्यात प्रवेशासाठी गोमूत्राचा टिळा अन् पवित्र धागा! मुंबईमधील पोस्टरवरून वाद

कौस्तुभ गावडे आणि स्मिता जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी पिसाळ आणि महापौर मंजुषा नागपुरे उपस्थित होते. आता गैरहजर नगरसेवक काय खुलासा करतात आणि त्यांच्या उत्तरानंतर भाजप काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सभागृह नेत्यांकडून कडक कारवाईचा इशारा

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आयोजित कार्यक्रमाला काही नगरसेवकांनी दांडी मारली होती. या अनुपस्थितीची पक्षाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशींना संबंधित नगरसेवक उत्तर देतील, असं पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com