गरब्यात प्रवेशासाठी गोमूत्राचा टिळा अन् पवित्र धागा! मुंबईमधील पोस्टरवरून वाद

Malad Garba Controversy Cow Urine Tilak Entry Rule: नवरात्रोत्सव तोंडावर आलेला असताना आता गैरहिंदूना गरबाच्या मंडपात नो एण्ट्री असल्याचं काही जणांनी जाहीर केल्यानं वााद सुरु झालाय. इतकंच नाही तर गरब्यात प्रवेश करण्यासाठी गोमूत्र शिंंपडण्याची आणि टिळा लावण्याची अट ठेवण्यात आली आहे. कुठे अशी अट ठेवण्यात आली आहे? आयोजकांची भूमिका नेमकी काय़ आहे? पाहूया एक रिपोर्ट...
Mumbai Garba Event Sparks Row Over Cow Urine Tilak and Entry Restrictions
Mumbai Garba Event Sparks Row Over Cow Urine Tilak and Entry Restrictionssaam tv
Published On: 

याच पोर्स्टरवरून आता मोठा वाद निर्माण झालाय. मुंबईतील मालाडमधील एका भाजप आमदाराच्या गरबा कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या पोस्टर्समध्ये गैर-हिंदूंसाठी कडक नियम ठेवण्यात आले आहेत. गोमूत्रापासून बनवलेला टिळा कपाळाला लावून आणि पवित्र धागा बांधून घेतला तरच प्रवेश दिला जाणार आहे. लव्ह जिहादला विरोध करण्याच्या नावाखाली सुरू झालेल्या या मोहिमेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

जिथे हा गरबा होणार आहे त्या ठिकाणी जाऊन सामच्या प्रतिनिधीने आढावा घेतला आणि आयोजकांशी संवाद साधलाय. दरम्यान गरब्यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंडपांवर पाळत ठेवण्याची योजना आखली आहे. या संघटनांच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीही ओळखपत्रांची तपासणी करण्यात आली होती.

त्यावेळीही टिळा लावण्यात आला होता. या वेळेस आयोजकांना मंडपांच्या बाहेर भगवान वराहाचे कटआउट लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कठोर उपाययोजनांमुळे समाजकंटकांना आळा बसेल, असा आयोजकांचा विश्वास आहे. मात्र गरब्यासारख्या धार्मिक उत्सवासाठी अशा नियमांच्या सक्तीवरुन तीव्र आक्षेपही घेतले जात आहेत. त्यामुळे कुठलाही वाद न होता हा उत्सव शांततेत पार पडावी हीच अपेक्षा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com