Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Pune Sex Racket Bust News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेळू येथील आमराई रिसॉर्टवर राजगड पोलिसांचा छापा. कथित वेश्याव्यवसाय प्रकरणात १३ महिलांची सुटका, एका संशयिताला अटक आणि फरार आरोपीचा शोध सुरू.
Pune News
Pune NewsAI Image
Published On: 
Summary
  • पुण्यातील भोरमध्ये धक्कादायक प्रकार

  • आमराई रिसॉर्टवर राजगड पोलिसांची कारवाई

  • राज्यांतील १३ महिलांची सुटका

  • या प्रकरणात एका संशयिताला अटक

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेळू परिसरात कथित वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजगड पोलिसांनी एका रिसॉर्टवर छापा टाकला. या कारवाईत १३ महिलांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वेळू येथील आमराई रिसॉर्टमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. संबंधित ठिकाणी मागील दोन महिन्यांपासून महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून तपास केला. त्यानंतर रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायावर छापा टाकण्यात आला.

Pune News
Health Care : रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणी महिलांकडून एक हजार रुपयांच्या मोबदल्यात वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले. रिसॉर्टची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी १३ महिलांची सुटका केली. या महिला मुंबई, ठाणे, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या विविध भागांतील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वैभव बालाजी इंगळे आणि रघु शेट्टी या दोघांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, कथित रॅकेटचा मुख्य सूत्रधार फरार असल्याचे सांगितले जात आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Pune News
Sleep Health : अंतर्वस्त्रे न घालता रात्री झोपणं खरंच फायदेशीर आहे का?

दरम्यान, या रिसॉर्टची मालकी नेमकी कोणाकडे आहे आणि त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कोण सांभाळत होते, याचाही तपास केला जात आहे. रिसॉर्टचा वापर या कथित गैरप्रकारासाठी होत असताना अन्य व्यक्तींचा सहभाग होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत. रिसॉर्टचा संबंध एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याशी असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com