Accident CCTV : हवेत उडाला आणि वरचेवर गर्रकन फिरला; तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Pune Accident CCTV Sanaswadi Accident News : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी येथे भरधाव कारने धडक दिल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Pune Accident CCTV Sanaswadi Accident News
Pune Accident CCTV Sanaswadi Accident NewsSaam TV marathi
Published On

रोहिदास गाडगे, पुणे प्रतिनिधी

Sanaswadi Pune CCTV accident video worker killed : पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका मजुराला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली आहे. हा अपघात इतका भयानक होता की, धडकेनंतर संबंधित मजूर अक्षरशः फुटबॉलसारखा हवेत उंच उडून पुन्हा रस्त्यावर आदळला. अपघाताचा हा थरारक क्षण सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेत राजकुमार नावाच्या तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे.

शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत मजूर राजकुमार हा परप्रांतीय असून तो कामानिमित्त येथे राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (MH 12 WP 9667) त्यांना भीषण धडक दिली. या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, राजकुमार यांचा जागीच प्राण गेला.

Pune Accident CCTV Sanaswadi Accident News
Maharashtra politics : १५ महिन्यात राष्ट्रवादीच्या ३ दिग्गजांचे राजीनामे, २ मंत्र्यांचा समावेश, नेमकी कारणं काय?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघातानंतर संबंधित कार चालक फरार झाला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत.दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Pune Accident CCTV Sanaswadi Accident News
Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर कोणते राजकीय नेते, VIP जायचे? SIT चौकशीत सगळ्यांची नावं उघड

पुणे–अहिल्यानगर मार्गावर वाहनांचा वाढता वेग आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावर तातडीने वेगमर्यादा लागू करावी, तसेच झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल आणि इतर सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेने महामार्गावरील बेदरकार वाहनचालकांमुळे निष्पाप जीवांचा बळी जात असल्याचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

Pune Accident CCTV Sanaswadi Accident News
Pune : पुण्यात भयंकर अपघात, चिमुकल्या बहीण-भावाला ट्रेम्पोनं चिरडलं, हसत्या-खेळत्या घरावर दु:खाचा डोंगर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com