Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात, ट्रकचालकाने दुचाकीस्वार तरुणांना फरफटत नेलं; दोघांचा जागीच मृत्यू

Pune Latest Accident News : पुण्यातील खराडी बायपास परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला.
Pune Latest Accident News
Pune Latest Accident NewsSaam TV

पुणे शहरातील अपघातांचे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. कल्याणीनगर परिसरातील अपघाताची घटना ताजी असतानाच आता खराडी बायपास परिसरातही भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

Pune Latest Accident News
Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदला, पुण्यातील डॉक्टरांना बड्या व्यक्तीचा फोन? कारनामा उघड!

तर अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास खराडीतील जकात नाका चौकात घडली. आदिल शेख असे एका तरुणाचे नाव असून इतर दोघांचे नाव समजू शकलेले नाही.

याप्रकरणी पोलिसांनी श्यामबाबू रामफळ गौतम या ट्रकचालकाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवक मूळचे लातूरचे असून ते सध्या वाघोली येथे शिक्षण घेत होते. सोमवारी रात्री तिघेही दुचाकीवरून खराडी बायपास परिसरातील जकात नाका येथे सिग्नलवर थांबले होते.

त्याचवेळी मालवाहतूक ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेने येत होता. दरम्यान, ट्रकचालक गौतम याने सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीस्वार काही मीटरपर्यंत फरफरटत गेले. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. सध्या एका तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून वैद्यकीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटल रुग्णालयात नेण्यात आलं. घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

Pune Latest Accident News
Shocking News : दिल्ली-वाराणसी विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन; प्रवाशांनी खिडकीतूनच मारल्या उड्या, धक्कादायक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com