Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव टँकरची दुचाकीला धडक, चाकाखाली चिरडून नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Pune- Satara Highway Accident: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात झाला. खेड शिवापूर टोलनाक्यावर भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये नवरा-बायकोचा जागीच मृत्यू झाला.
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव टँकरची दुचाकीला धडक, चाकाखाली चिरडून नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Pune AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • पुण्याजवळील खेड शिवापूर टोलनाक्यावर भीषण अपघात

  • भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने नवरा-बायकोचा मृत्यू

  • दोघेही टँकरच्या चाकाखाली चिरडले गेल्याने जागीच मृत्यू झाला

  • दोघेही पुण्यातील पर्वती परिसरातील रहिवासी असल्याची माहिती

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. टँकरच्या चाकाखाली नवरा बायको चिरडले गेले. पुणे- सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याजवळील खेड शिवापूर टोलनाक्यावर दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरून जाणारे नवरा-बायको रस्त्यावर पडले. त्यानंतर टँकरच्या चाकाखाली चिरडल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. मृत्यू झालेले दोघेही पुण्यातील पर्वती परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव टँकरची दुचाकीला धडक, चाकाखाली चिरडून नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Pune Accident: PMPML चे अध्यक्ष आव्हाड यांच्या कारला भीषण अपघात, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर घडली घटना

साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला टँकरने चिरडलं. या अपघातामध्ये राजेंद्र बबन मोरे आणि सविता राजेंद्र मोरे या दोघांचा मृत्यू झाला. ते दोघेही पुण्यातील वारजे माळवाडी येथे राहणारे होते. दोघांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच खेडशिवापूरच्या राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस सध्या अपघाताचा तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव टँकरची दुचाकीला धडक, चाकाखाली चिरडून नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

दरम्यान, धुळ्यामध्ये पेट्रोलचा टँकर पलटल्याने मोठा अपघात झाला. साक्री तालुक्यातील दहिवेल पिंपळनेर मार्गावर रस्त्याच्या मधोमध पेट्रोलचा टँकर उलटला. अपघातानंतर संधी साधू नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल भरून नेले. अपघातात टँकरमधून मोठ्या प्रमाणात पेट्रोलची गळती झाली. टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. पेट्रोल टंचाईच्या काळात टँकर पलटी झाल्यामुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच चंगळ झाल्याची चर्चा होत आहे.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव टँकरची दुचाकीला धडक, चाकाखाली चिरडून नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Accident News : ५ मित्रांचा बर्थडे पार्टीचा प्लान, घराकडे परत येताना काळचा घाला; बर्थ डे बॉयसह ३ मित्रांचा करुण अंत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com