PM Modi : पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आला फोन

PM Modi News : पंतप्रधान मोदींना जिवे माऱण्याचा फोन मुंबई पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फोन करणाऱ्या महिलेला ताब्या घेतलेय. पोलीस त्या महिलेची चौकशी करत आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Saam tv
Published On

PM Modi Life Threatened : महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकी देणारा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्रि‍पदाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यादरम्यानच मोदी यांना धमकी देणारा कॉल आल्याने खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आला आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याचा प्लॅन झाला असल्याचा महिला कॉलरने दावा केला आहे. धमकीचा फोन येताच मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी याप्रकरणी फोन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलाय. शितल चव्हाण असे फोन करणाऱ्या महिलेचं नाव आहे.

PM Narendra Modi
Maharashtra Politics : नवा ट्विस्ट..! ५० च्या आत वय असेल तरच मंत्रिमंडळात स्थान, दिग्गजांचा पत्ता कट?

महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. अमित शाह आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आज बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महराष्ट्रातील मुख्यमंत्र्‍यांच्या शपथविधीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकीय घडमामोडी वेगात घडत असतानाच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कशाला मोदींना जिवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी फोन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं. पोलिसांकडून फोन करणाऱ्या महिलेची कसून चौकशी करण्यात येत आहे. धमकीच्या फोनमध्ये किती तथ्य आहे, याबाबत माहिती घेतली जात आहे.

PM Narendra Modi
Sangli Accident: मध्यरात्री भरधाव गाडी कृष्णा नदीत कोसळली, ३ जणांचा मृत्यू, ३ जणांची प्रकृती गंभीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com