भाजपच्या आमदार अन् माजी महापौरात राडा; MLAच्या समर्थकांकडून महापौर विलास पाटलांच्या  घरावर हल्ला

भाजपच्या आमदार अन् माजी महापौरात राडा; MLAच्या समर्थकांकडून महापौर विलास पाटलांच्या घरावर हल्ला

Bhiwandi Violence: महापालिका निवडणुकीच्या निकालावरून भिवंडीत भाजप आमदार महेश चौघुले आणि कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला.. आमदारांच्या मुलाचा पराभव आणि कोणार्क आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलेला पाठिंबा यावरून हा वाद उफाळला.
Published on

भिवंडी पश्चिमचे भाजप आमदार महेश चौघुले व कोणार्क आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. समर्थकांनी माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही पती पत्नी जखमी झाले आहेत. माजी महापौर आणि आमदाराचा मुलाने भिवंडी निजामपूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली.

दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. यात भाजप आमदाराचा मुलाचा पराभव झाला. कोणार्क आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलेला पाठिंबा यावरून हा वाद उफाळला. यावेळी संतप्त जमावाने विलास पाटील यांच्या घरावर दगडफेक केली, ज्यामध्ये पाटील पती-पत्नी जखमी झाले असून परिसरात तणावाचं वातावरण आहे.

भाजपच्या आमदार अन् माजी महापौरात राडा; MLAच्या समर्थकांकडून महापौर विलास पाटलांच्या  घरावर हल्ला
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सेनेच्या कार्यालयावर अज्ञातांचा हल्ला; उद्धव ठाकरेंचा बॅनर फाडला

भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत माजी महापौर विलास पाटील यांचा मुलगा मयूरेश विलास पाटीलचा विजय झाला. यात भिवंडी पश्चिमचे भाजप आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित चोघुळेचा पराभव झाला. यामुळे दोन्ही गटाकडील दोन्ही सर्मथकांमध्ये राडा झाला. यामध्ये अनेक जण जखमी झाले.

भाजपच्या आमदार अन् माजी महापौरात राडा; MLAच्या समर्थकांकडून महापौर विलास पाटलांच्या  घरावर हल्ला
Akola News: भाजपच्या विजयी उमेदवारावर जीवघेणा हल्ला; दोन गटात तुफान राडा

मतदानाच्या दिवसांपासून या दोन्ही गटात वारंवार तणाव आणि वादाचे वातावरण होते. आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांनी माजी महापौर विलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण देखील केली होती. यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत कोणार्क आघाडीचे चारही उमेदवार विजयी झाले. तर आमदारांचा मुलगा हा पराभूत झाला त्यामुळे तणाव पुन्हा नव्याने वाढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com