Stone Pelting On  Kolhapur UBT Office:
Broken glass and damaged property seen at Shiv Sena (UBT) office in Kolhapur after the attack.saam tv

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सेनेच्या कार्यालयावर अज्ञातांचा हल्ला; उद्धव ठाकरेंचा बॅनर फाडला

Stone Pelting On Kolhapur UBT Office: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर अज्ञात हल्लेखोरांनी राजारामपुरी येथील ठाकरे गटाच्या कार्यालयावर हल्ला केला. हल्लेखोरांनी उद्धव ठाकरे यांचे बॅनरदेखील फाडले.
Published on
Summary
  • कोल्हापूर महापालिका निकालानंतर सेनेच्या कार्यालयावर हल्ला

  • राजारामपुरी येथील शिवसेना कार्यालयाची तोडफोड

  • उद्धव ठाकरेंचा बॅनर फाडल्याने परिसरात तणाव

रणजीत माजलगावकर, साम प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेचा निकाल लागल्यानंतर ठाकरे सेनेच्या कार्यालयावर अज्ञातांनी हल्ला केलाय. तुफान दगडफेक आणि बाटल्या फेकून मारत कार्यालयाच्या काचा फोडल्या. राजारामपुरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागीय कार्यालयावर आहे. कार्यालयाच्या काचा फोडल्यानंतर काहींनी उद्धव ठाकरेंचा बॅनरवरील फोटोही फाडलाय. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. घटनास्थळी पोलीस दाखल झालेत.

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा निकाल लागला. या महायुतीनं बाजी मारली असून बहुतेक महापालिकेत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. कोल्हापुर महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची एक जागा निवडून आणली आहे. निकाल लागल्यानंतर राजारामपुरी येथील ठाकरेंच्या शिवसेनेच्या विभागीय कार्यालयावर अज्ञातांनी हल्ला केला. शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे यांच्या टाकळा चौक परिसरातील कार्यालयाच हल्ल्यात मोठं नुकसान झालंय. कार्यालयावर दगडफेक केल्यानतंर अज्ञातांनी उद्धव ठाकरेंचा फोटो असलेलं बॅनर सुद्धा फाडण्यात आला.

शिवसेना उत्तर विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे म्हणाले की, महापालिकेचा निकाल लागल्यानंतर काही शहारातील अज्ञातांनी कार्यालयावर हल्ला केला. त्यांनी कार्यालयात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो सुद्धा फाडण्यात आलेत. छत्रपत्री शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचेही फोटो फाडण्यात आलेत. आमच्याकडे हल्लेखोरांची फुटेज आले आहेत. या हल्लेखोरांना कडक शिक्षा व्हावी, नाहीतर शिवसेना राज्यभरात आंदोलन करेल असा इशारा देवकुळे यांनी दिलाय.

Stone Pelting On  Kolhapur UBT Office:
Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचा निकाल लागताच दोन मोठे निर्णय; बिल्डरांचे धाबे दणदणार

कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे स्वप्न धुळीस

अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसने ३५ जागांवर विजय मिळवला. या निवडणुका आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात लढवण्यात आल्या. मात्र महापालिकेवर तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचे काँग्रेसचे स्वप्न महायुतीने धुळीस मिळालंय. या महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षालाही एका जागा मिळालीय. दुसरीकडे महायुतीला ४४ जागा मिळाल्या आहेत. तर विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला एक जागा मिळालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com