Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचा निकाल लागताच दोन मोठे निर्णय; बिल्डरांचे धाबे दणदणार

Ganesh Naik in Action Mode: नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपने मोठा विजय मिळवलाय. गणेश नाईक यांनी बेकायदेशीर उंच इमारतींविरुद्ध कारवाईसह दोन मोठे निर्णय घेतलेत.
Ganesh Naik in Action Mode:
BJP leader Ganesh Naik addressing the media after Navi Mumbai municipal election results.
Published On
Summary
  • नवी मुंबई महापालिकेत भाजपला 66 जागांवर विजय

  • निकालानंतर गणेश नाईक अॅक्शन मोडमध्ये

  • अनधिकृत टोलेजंग इमारतींचे बांधकाम बंद करण्याचा निर्णय

भाजपने नवी मुंबई महानगरपालिकेतही आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १११ पैकी ६६ जागांवर भजापने विजय मिळवलाय. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) २४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. नवी मुंबई महापालिकेतील मोठा विजयानंतर भाजप नेते गणेश नाईकांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन मोठे निर्णय घेतलेत. त्यामुळे शहरातील बिल्डर लोकांचे धाबे दणादणले आहेत.

निवडणुकीचा निकाल लागताच मंत्री गणेश नाईक अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी बांधकाम संदर्भातील दोन मोठे निर्णय घेतले. निवडून आलेल्या ६५ नगरसेवकांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितले. यासह त्यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. नवी मुंबईतील परिसरातील अनधिकृत टोलेजंग इमारतींचे बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावे.

Ganesh Naik in Action Mode:
नवी मुंबईत भाजपची मोठी आगेकूच; गणेश नाईकांनी खोचक पोस्ट करत शिंदेंना डिवचलं|VIDEO

शहरातील मैदाने बिल्डरांच्या घशात घालू नयेत, अशी ठाम भूमिका गणेश नाईकांनी माध्यमांशी बोलताना मांडली. नवी मुंबईतील सिग्नलवर होणारी वाहतूक कोंडी, भिकाऱ्यांचा प्रश्न यासह शहरातील अनेक प्रलंबित समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील. २०३० पर्यंत वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवरही ठोस उपाययोजना राबवण्यात येतील. असे गणेश नाईक म्हणाले.

Ganesh Naik in Action Mode:
Municipal Election Result: मुंबईवर भाजपचाच झेंडा, राज्यात 25 ठिकाणी सत्ता, महापालिका विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबईप्रमाणे नवी मुंबई महापालिकेची निवडणूक खूप चुरशीची होती. भाजप नेते गणेश नाईक थेट एकनाथ शिंदेंवर टीका करत होते. नवी मुंबईतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत गणेश नाईक यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे ही निवडणूक खूप प्रतिष्ठेचे ठरली होती.

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण १११ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक निवडून दिला जातो. या महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला वा आघाडीला निम्म्याहून अधिक जागा जिंकून बहुमताचा आकडा पार करणे आवश्यक असते. या भागात २०२६ मधील महानगरपालिका निवडणुका अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे अत्यंत निर्णायक ठरलीय. शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, नागरी सुविधा आणि एकूणच शहरी प्रशासन या विषयांवर मतदारांचे लक्ष केंद्रित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com