नवी मुंबईत भाजपची मोठी आगेकूच; गणेश नाईकांनी खोचक पोस्ट करत शिंदेंना डिवचलं|VIDEO

BJP Big Lead In Navi Mumbai Municipal Corporation Election: नवी मुंबई महापालिकेत भाजपची मोठी आगेकूच झाली असून शिंदे गटाच्या शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला आहे. निकालानंतर मंत्री गणेश नाईक यांनी खोचक पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदेंना डिवचले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपने आपली सत्ता कायम राखत शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठ्या पराभवाचा धक्का दिला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मंत्री गणेश नाईक यांनी शिंदे गटाचे घोडे गायब होतील असा सूचक इशारा दिला होता. आता निकालानंतर आलेल्या आकडेवारीने नाईकांचा हा दावा खरा ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्याच्या निकालानुसार नवी मुंबई महापालिकेत भाजपने मोठ्या फरकाने आघाडी घेतली असून शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षेपेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गणेश नाईक यांनी सोशल मीडियावर एक खोचक पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे. या पोस्टमध्ये गणेश नाईक हे घोड्यासोबत चालताना दिसत असून त्यांच्या प्रचारातील विधानाची आठवण करून देणारी ही पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

नवी मुंबई महापालिकेतील सध्याची आघाडी :

भाजप – 72

शिवसेना (शिंदे गट) – 28

उबाठा – 2

अपक्ष – 1

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com