Akola News: भाजपच्या विजयी उमेदवारावर जीवघेणा हल्ला; दोन गटात तुफान राडा

Attack On BJP Winning Candidate In Akola : अकोल्यात दोन गटात राडा झाला आहे. भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. पोलीस ठाण्याजवळ त्यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला. रस्त्यांवरील वाहनांची तोडफोड करण्यात आलीय.
Attack On BJP Winning Candidate In Akola
Attack On BJP Winning Candidate In Akola saam tv
Published On
Summary
  • अकोल्यात निवडणूक निकालानंतर तुफान हिंसाचार

  • भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला

  • पोलीस स्टेशनसमोरच हल्ला झाल्याने खळबळ

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

अकोल्यातील अकोट फैल भागात दोन गटात तुफान राडा झालाय. भाजपचे विजय उमेदवार शरद तुरकर यांना बेदम मारहाण झाली आहे. अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आलीय. रस्त्यावरील अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. नितीन राऊत यांच्या समर्थकांनी भाजपचे विजय उमेदवार शरद तुरकर यांना बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे अकोटफैल पोलीस स्टेशनच्या समोरच हल्ला झालाय. पराभूत उमेदवाराच्या गटाने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळालीय.

अकोल्यात निवडणुक निकालानंतर अकोटफैल भागात दोन गटात मोठा राडा झाला. दोन गटात झालेल्या वादात प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. या प्रभागात शरद तुरकर हे भाजपचे एकमेव विजयी उमेदवार आहेत. तर इतर 3 ठिकाणी एमआयएमचे उमेदवार विजयी झालेत. हल्ल्यात शरद तुरकर गंभीर जखमी झालेत. हल्लेखोरांनी अनेक वाहनांची तोडफोड केली आहे. मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील करण्यात आलीय. दरम्यान घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अतिरिक्त कुमक मागवण्यात आलीय.

Attack On BJP Winning Candidate In Akola
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सेनेच्या कार्यालयावर अज्ञातांचा हल्ला; उद्धव ठाकरेंचा बॅनर फाडला

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद तुरकर यांच्यावर पराभूत उमेदवार नितीन राऊत यांनी यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय. यात शरद तुरकर यांच्या डोक्याला मार लागलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com