PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यापूर्वी दोन जणांना अटक करण्यात आली. आरोपींकडून पिस्तुल जप्त करण्यात आली.
PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?
PM Narendra ModiSaam Tv
Published On
  • पीएम मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न

  • मुंबईत दोन जणांना अटक

  • बीकेसीमध्ये पीएम मोदींच्या कार्यक्रमात घुसखोरीचा प्रयत्न

  • पीएमओ अधिकारी असल्याचे सांगून कार्यक्रमात घुसण्याचा प्रयत्न

  • पीएम मोदींच्या कार्यक्रमाआधी पिस्तूलधारी तरुणाला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न झालाय. बीकेसीतील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्य़े पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झालेत. या कार्यक्रमाआधी दोन तरुणांनी या कार्यक्रमात घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यातील एकाकडे पिस्तूलही सापडली. मात्र या घुसखोरीवेळी पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केलीय. मात्र तरुणांच्या अटकेआधी नेमकं काय घडलं पाहूयात...

मुंबईत मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंतप्रधानांच्या बीकेसीतील कार्यक्रमाआधी दोघांनी घुसखोरी केली. रोहन पारेख आणि दिलीप कुंडे अशी आरोपींची नावं आहेत. रोहन पारेखनं PMO कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगून घुसखोरीचा प्रयत्न केला.

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?
PM Modi: परदेशात जाणं टाळा, सोनं खरेदी करु नका; PM मोदींच्या 'त्या' व्हिडीओनंतर देशवासीय पुन्हा संभ्रमात

कार्यक्रमस्थळी आरोपी रोहन पारेखने बनावट कागदपत्र दाखवल्याचाही आरोप आहे. तसचं रोहनचा बॉडीगार्ड दिलीप कुंडेचं पिस्तूल पोलिसांकडून जप्त करण्यात आली. मात्र कार्यक्रमात घुसखोरीमागे या दोघांचा काय उद्देश होता? याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरु आहे. दरम्यान अतिसुरक्षित व्हीआयपी झोनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन्ही आरोपांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी आरोपीच्या वकीलानं धक्कादायक माहिती दिलीय.

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?
PM Modi : नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ, अमित शाहांवर डागली तोफ

आरोपीच्या वकीलांच्या दाव्यानुसार, पीएमओमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून रोहन पारेखची फसवणूक करण्यात आली. तरुण कपूर नावाच्या व्यक्तीने रोहन पारेखशी संपर्क साधला होता. पीएमओचं बनावट डिजिटल ओळखपत्र स्क्रीनशॉटच्या स्वरूपात पाठवण्यात आलं होतं. बनावट पीएमओ डिजिटल आयडी देणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि त्यामागील हेतू तपासणे आवश्यक आहे. डिसेंबर 2024 पासून पारेखला वैयक्तिक बॉडीगार्ड ठेवण्याच्या सूचना मिळाल्या त्यानुसारच पारेखने पर्सनल बॉडीगार्ड ठेवला. बीकेसी मॉलमध्ये होणाऱ्या पत्नीसाठी परफ्यूम खरेदी करण्यासाठी पारेख गेला होता. त्यावेळी पारेखनं पोलिसांना डिजिटल पीएमओ ओळखपत्र दाखवले. तेव्हाच तिसरा आरोपी तरुण कपूरकडून पारेखची फसवणूक झाल्याचं उघड झाल्याचा दावा आरोपी पारेखच्या वकीलानं केलाय.

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?
PM Modi: पंतप्रधान मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, BKC मधील कार्यक्रमस्थळी दोघांना अटक; पिस्तुल सापडल्यानं खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत घुसखोरी करणाऱ्या दोन्ही आरोपींना 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. रोपी पारेख हा खार परिसरातील रहिवासी असून 7 सप्टेंबरला कार्यक्रमस्थळाची रेकी केल्याची माहितीही समोर आलीय. तसंच आरोपीने लंडनच्या सिटी युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतल्याचीही माहिती समोर येतेय.

एकिकडे जागतिक पातळीवरील 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026' मुळे मुंबई आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असताना, दुसरीकडे व्हीआयपी सुरक्षेत पीएमओचा बनावट अधिकारी असल्याचे भासवून घुसखोरीचा प्रयत्न झाल्यानं सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय... आता याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा काय खुलासे करते? पंतप्रधानांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न आरोपींनी का केला? आरोपीच्या वकीलांच्या म्हणण्यानुसार पारेखचीच फसवणुक झालीय का? हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?
PM Modi Speech : कठीण काळातही भारतावरील विश्वास वाढला, UPI ते GDP...पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com