Maharashtra Politics : शरद पवारांचा एक डाव अन् अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; घड्याळाचे काटे उलटे फिरले!

Pimpri Chinchwad NCP News : पक्षउभारणी करताना शरद पवार यांनी पहिलाच धक्का अजित पवारांना दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील ४ बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश केलाय.
Ajit Pawar vs Sharad Pawar
Ajit Pawar vs Sharad PawarSaam TV
Published On

लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत. पक्षउभारणी करताना त्यांनी पहिलाच धक्का अजित पवारांना दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील ४ बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश केलाय.

Ajit Pawar vs Sharad Pawar
Ladki Bahin Yojana : आमदार महोदयांची चमकोगिरी, लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर छापला स्वत:चा फोटो; पाहा VIDEO

पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडलाय. पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, शरद पवारांनी त्यांच्या बालेकिल्ल्यालाच सुरूंग लावण्याचं काम केलंय. अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांमध्ये अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे तसेच माजी आमदार विलास लांडे यांचा समावेश आहे.

त्यांच्यासोबत एकूण २४ पदाधिकाऱ्यांनी देखील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठं खिंडार पडलं आहे. या नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना पाहून अनेक कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे.

कोणी-कोणी केला शरद पवार गटात प्रवेश?

अजित गव्हाणे (पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष) माजी महापौर हणमंतरावजी भोसले, वैशालीताई घोडेकर माजी महापौर, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेवक प्रवीण भालेकर, संगीता नानी ताम्हाणे, दिवंगत नगरसेविका पौर्णिमा ताई सोनवणे यांचे पती रवी आप्पा सोनवणे, दिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने नगरसेवक, संजय नेवाळे,नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेवक विजयाताई तापकीर, शहर जिल्हा कार्याध्यक्ष मा विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

याशिवाय नगरसेवक समीर मासुळकर, नगरसेवक गीताताई मंचरकर, नगरसेवक संजय वाबळे, माजी नगरसेविका वैशालीताई उबाळे, सौ शुभांगी ताई बोराडे,सौ विनया ताई तापकीर, नगरसेविका अनुराधा गोफने, नगरसेवक घनश्याम खेडेकर, युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे, मा. नगरसेवक तानाजी खाडे, मा. नगरसेवक श्री शशिकीरण गवळी, विशाल आहेर युवराज पवार कामगार आघाडी, विशाल आहेर सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा, नंदूतात्या शिंदे, शरद भालेकर यांनी देखील अजित पवार यांची साथ सोडली आहे.

Ajit Pawar vs Sharad Pawar
IAS Pooja Khedkar: सुहास दिवसे यांनी माझा लैंगिक छळ केला, IAS पूजा खेडकर यांची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com