IAS Pooja Khedkar: सुहास दिवसे यांनी माझा लैंगिक छळ केला, IAS पूजा खेडकर यांची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

IAS Pooja Khedkar: पुजा खेडकर यांची पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्याविरोधात वाशिम पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दिवसे यांनी लैगिंक आणि मानसिक छळ केल्याचा तक्रारीत पुजा खेडकर यांनी आरोप केल्याची माहिती आहे.
सुहास दिवसे यांनी माझा लैगिंक छळ केला, IAS पूजा खेडकर यांची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार
IAS Pooja Khedkar And Pune Collector Suhas DiwaseSaam Tv
Published On

नितीन पाटणकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस आधिकारी पुजा खेडकर यांच्या प्रकरणात ऐक नवीन ट्विस्ट आला आहे. पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवस यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला आहे. पोलिस सूत्रांनी मंगळवारी सायंकाळी ही माहिती दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा खेडकर यांची पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्याविरोधात वाशिम पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दिवसे यांनी लैगिंक आणि मानसिक छळ केल्याचा तक्रारीत पुजा खेडकर यांनी आरोप केल्याची माहिती आहे. ⁠वाशिम पोलिसांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुजा खेडकर यांची तक्रार नोंदवून घेतली आहे.

सुहास दिवसे यांनी माझा लैगिंक छळ केला, IAS पूजा खेडकर यांची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार
Maharashtra Politics: कोण विश्वासू, कोण विश्वासघातकी? ठाकरे की फडणवीस? ठाकरेंसाठी शंकराचार्य भिडले

मात्र दिवसे यांच्याविरोधातील तक्रार वाशिम पोलीसांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने ही तक्रार पुणे पोलीसांकडे वर्ग होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, सरकारने मंगळवारी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित केलं आहे. त्यांना 23 जुलैपर्यंत लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. नागरी सेवा परीक्षेत निवड होण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर आहे.

सुहास दिवसे यांनी माझा लैगिंक छळ केला, IAS पूजा खेडकर यांची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार
MPs Bungalow: सरकारी बंगला रिकामा करा! 200 माजी खासदारांना बजावण्यात आली नोटीस

पूजा खेडकर या खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरल्याने चर्चेत आल्या. नंतर हे प्रकरण खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र इथपर्यंत पोहोचलं. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com