थरारक! तरुण रेल्वे ट्रॅकवर डोके ठेवून झोपला, तितक्यात ट्रेन आली अन्...; CSMT स्टेशनवरील धक्कादायक प्रकार, VIDEO

CSMT रेल्वे स्टेशनमध्ये ट्रॅकवर तरुण झोपल्याची घटना घडली. या घटनेमुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाली.
CSMT railway station
CSMT Saam tv
Published On
Summary

CSMT स्टेशनवर एक तरुण ट्रॅकवर झोपल्याची घटना

लोकल ट्रेन आल्यानंतर काही क्षण तणावाचे वातावरण

प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोटरमनने तातडीने ट्रेन थांबवली

मयूर राणे, साम टीव्ही

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर धक्कादायक घटना घडली. एक तरुण थेट स्टेशनवर ट्रॅकवर जाऊन झोपला. तरुण थेट ट्रॅकवर जाऊन झोपल्याने प्रवाशांची एक धांदल उडाली. तरुण झोपलेल्या ट्रॅकवर अचानक ट्रेन आल्याने प्रवाशांची एकच धावाधाव झाली. प्रवाशांनी मोटरमनला आवाज देत गाडी थांबवण्यास सांगितली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तरुण झोपलेल्या ट्रॅकवर लोकल गाडी येत असल्याने काही क्षणांसाठी स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. काही सजग प्रवाशांनी तातडीने ही घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर तात्काळ रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत रेल्वे पोलिसांनी संबंधित व्यक्तीला सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं. त्यामुळे संभाव्य अपघात टळला आणि स्टेशनवर मोठी दुर्घटना घडली नाही.

CSMT railway station
Explainer : स्वप्नाचं घर की कर्जात अडकलेले आयुष्य? बिल्डरकडून फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी आर्थिक गणित समजून घ्या

या धक्कादायक घटनेनंतर काही काळ प्लॅटफॉर्मवरील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. रेल्वे पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची सुरू केली आहे. प्लॅटफॉर्मवर कसा पोहोचला, याचाही तपास केला जात आहे.

CSMT railway station
मुख्याध्यापकाने आयुष्य संपवलं; शैक्षणिक वर्तुळात खळबळ

तरुण दारूच्या नशेत?

व्हिडिओमध्ये ट्रॅकवर झोपलेला तरुण दारूच्या नशेत होता. तसेच स्टेशन परिसरात भिक्षा मागणारा तरुण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस चौकशी पूर्ण झाल्यानंतर या तरुणाविषयी अधिकृत माहिती समोर येईल. परंतु ट्रेन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला ट्रॅकमधून बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

तरुणावर गुन्हा दाखल

तरुण दुपारी 3 वाजल्याच्या सुमारास फ्लॅटफॉर्म क्रमांक एकवर मद्यधुंद अवस्थेत रेल्वे रुळावर झोपला होता. या तरुणामुळे काही वेळ रेल्वे विस्कळीत झाली. या प्रकरणी या तरुणावर रेल्वे कायदा, कलम 145 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com