Palghar youth drowned a student went missing
Palghar youth drowned a student went missingSaam Tv News

Palghar News : बंधाऱ्यात पोहायला गेला अन् जीव गमावला, एक विद्यार्थी बेपत्ता; पालघरमध्ये खळबळ

Palghar News : पालघर तालुक्यातील मासवण येथील सूर्या नदीच्या बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या अभिषेक बिऱ्हाडे(वय २४) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. कालव्याच्या पाण्यात एक विद्यार्थी वाहून गेल्यानं बेपत्ता झाला आहे.
Published on

पालघर : पालघर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत एक विद्यार्थी कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे. पालघर तालुक्यातील मासवण येथील सूर्या नदीच्या बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या अभिषेक बिऱ्हाडे(वय २४) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. तर डहाणू तालुक्यातील सारणी येथे कालव्याच्या पाण्यात दक्ष मर्दे हा विद्यार्थी वाहून गेल्यानं बेपत्ता झाला आहे. उन्हाच्या काहिलीने हैराण झाल्यामुळे अनेक जण सध्या जिल्ह्यातील समुद्र, नद्या, बंधारे आणि कालव्याच्या पाण्यात डुबण्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून या ठिकाणी जीवरक्षक किंवा सुरक्षित साधनां अभावी अपघाती घटना घडत आहेत.

पोटच्या दोन्ही मुलांसह भाच्याचा अंत

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रात आज सकाळी दोन भावांसह एका नातेवाईकाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मृत तरुणाची नावे मयुरेश पाटील (वय २३), हिमांशू पाटील (वय २१) आणि अवधूत पाटील (वय २६) असल्याची माहिती आहे.

Palghar youth drowned a student went missing
Raigad News : शेकापच्या संतोष पाटलांवर दु:खाचा डोंगर, पोटच्या दोन्ही मुलांसह भाच्याचा अंत; समुद्रानं केलं गिळंकृत

शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस संतोष पाटील यांच्यावर आज शनिवारी दुःखाचा डोंगर कोसळला. पोहायला गेलेल्या आपल्या दोन मुलांसह नातेवाईकातील एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोटच्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं त्यांच्यावर दु:खाचं डोंगरच कोसळला आहे. हे ऐकून कुटुंबासह नातेवाईकांनाही धक्का बसला आहे. ही बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. नेमकं काय झालं, हे ही अनेकांना माहिती नव्हतं. या आघातानं कुटुंब, नातेवाईक आणि गावावर शोककळा पसरली आहे.

Palghar youth drowned a student went missing
Ayush Mhatre : मुंबईविरुद्ध IPLमध्ये पदार्पण, आयुष म्हात्रेचा मराठी VIDEO; घरच्या मैदानात वसईचा पठ्ठ्या राडा करणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com