Palghar: महिला सरपंचाला अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Palghar Sarpanch Arrested: पालघरमध्ये महिला सरपंचाला अटक करण्यात आली. या महिला सरपंचाला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. या कारवाईमुळे पालघरमध्ये चर्चेला उधाण आले.
Palghar: महिला सरपंचाला अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं
Palghar Sarpanch ArrestedSaam Tv
Published On

Summary:

  • पालघरमध्ये महिला सरपंच लाच घेताना अटक

  • तारापूर ग्रामपंचायतीत एसीबीची कारवाई

  • ना हरकत दाखल्यासाठी लाच मागितल्याचा आरोप

  • महिला सरपंचाला रंगेहाथ पकडलं

पालघरमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. महिला सरपंचाला अटक करण्यात आली. सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पालघर जिल्ह्यातील तारापूर ग्रामपंचायतीच्या त्या सरपंच आहेत. ग्रामपंचायतीच्या एनओसी आणि ना -हरकत दाखल्यासाठी त्यांनी पैसे मागितले होते. हे पैसे स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले. या कारवाईमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर तालुक्यातील तारापूरच्या महिला सरपंचाला ४००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. महिला सरपंचाकडून ना हरकत दाखला देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिला सरपंच संध्या संजय पागधरे यांना अटक करण्यात आली आहे. तारापूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर एसीबीकडून सापळा रचून कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पुढील कारवाई सुरू आहे.

Palghar: महिला सरपंचाला अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं
Sindhudurg : सिंधुदुर्गात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB ने मुसक्या आवळल्या

या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांची बहीण यांना डाय मेकिंगचा व्यवसाय सुरू करायचा होता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना एनओसी आणि ना -हरकत दाखल्याची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी सरपंचाकडे मागणी केली तर त्यांनी पैशांची मागणी केली. त्यांनी ४००० रुपये मागितले. या तक्रार महिलेने एसीबीकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचत सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ अटक केली. सध्या महिला सरपंचाची चौकशी सुरू आहे.

Palghar: महिला सरपंचाला अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं
Navi Mumbai: नवी मुंबईत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com