कोण आहेत मस्साजोगचे सरपंच? संतोष देशमुखांनी ९ मतांनी हरवलं होतं; आता 92 मतांनी निवडून आले

Masajog Gram Panchayat Election Result 2026: बीडमधील मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव करत सरपंचपद मिळवले.
Swaroopanand Deshmukh celebrates victory after winning the Masajog Sarpanch election by 92 votes in Beed.
Swaroopanand Deshmukh celebrates victory after winning the Masajog Sarpanch election by 92 votes in Beed.saam tv
Published On

बीड: मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निकालाने बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या अटीतटीच्या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. मस्साजोगच्या ग्रामपंचायतीची ही निवडणूक मोठी प्रतिष्ठेची ठरली होती. गावामध्ये राजकीय वर्चस्वासाठी दोन्हीकडून जोरदार प्रचार झाला. शेवटी ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल देत त्यांना स्पष्ट बहुमताने विजयी केले. निकाल जाहीर होताच समर्थकांनी गुलाल उधळत आणि जल्लोष करत साजरा केला.

Swaroopanand Deshmukh celebrates victory after winning the Masajog Sarpanch election by 92 votes in Beed.
Nana Patole | काँग्रेसचं खुर्चीपेक्षा विचाराला जास्त महत्व- नाना पटोले | Election Result

स्वरूपानंद देशमुख कोण?

स्वरूपानंद देशमुख हे गावातील एक अनुभवी नेते मानले जातात. याआधीही त्यांनी संतोष देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा अवघ्या 9 मतांनी पराभव झाला होता. तसेच ग्रामपंचायतीत अनेक वर्ष काम केले असून विविध योजना राबवल्या आहेत. माझे कामच माझी ओळख आहे असे त्यांनी प्रचारादरम्यान सांगितले होते.

Swaroopanand Deshmukh celebrates victory after winning the Masajog Sarpanch election by 92 votes in Beed.
Nashik Crime: नाशिक हादरले! दिवसाढवळ्या महिलेकडून तरुणाची हत्या, आधी दगडाने ठेचलं नंतर कोयत्याने सपासप वार; थरकाप उडवणारा VIDEO

संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. सरपंचपद रिक्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी काही ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या सरपंचपदासाठी मैदानात उतरल्या होत्या. त्यांना बिनविरोध निवडून देऊन दिवंगत संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी भावना व्यक्त केली जात होती. मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि विजय प्राप्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com