Palghar : धक्कादायक! महसूल सहाय्यक स्नेहल सावंत यांचा मृत्यू; प्रियकराने रस्त्यात गाठले अन्...

Palghar Crime News : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक स्नेहल सावंत यांचा तीन महिन्यांच्या उपचारानंतर पुण्यात मृत्यू. प्रेमसंबंधातून हल्ला केल्याचा आरोप असलेल्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी.
Palghar Snehal Sawant Murder Case News
Palghar Snehal Sawant Murder Case NewsSaam Tv
Published On
Summary
  • पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील २७ वर्षीय महसूल सहाय्यक स्नेहल सावंत यांचा मृत्यू

  • घरी जात असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाला होता

  • प्रेमसंबंधातून प्रियकराने हल्ला केल्याचे समोर

  • आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

रुपेश पाटील, पालघर

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या २७ वर्षीय स्नेहल सावंत यांची गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असताना काल संध्याकाळी उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पालघर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात कामावरून सुटल्यानंतर घरी जात असताना स्नेहल सावंत यांच्यावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. प्रेमसंबंधातून त्यांचा प्रियकर अमोल मुळे याने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. अमोल मुळेने स्नेहल यांच्या मानेसह शरीराच्या विविध भागांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले होते. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते.

Palghar Snehal Sawant Murder Case News
Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

हल्ल्यात स्नेहल सावंत गंभीर जखमी झाल्या होत्या. घटनेनंतर त्यांना तातडीने बोईसर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले होते. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या तीन महिन्यांपासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. मात्र, अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Palghar Snehal Sawant Murder Case News
Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

दरम्यान, हल्ल्यानंतर फरार झालेल्या अमोल मुळे याचा पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेत त्याला अटक केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. स्नेहल सावंत यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर पालघरमध्ये शोककळा पसरली आहे. एका तरुण महिला कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि स्नेहल सावंत यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com